मुख्याध्यापक पदोन्नती संचिका रखडल्या

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषद शिक्षण विभागातील मुख्याध्यापक पदोन्नतीच्या संचिका मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकल्या आहेत. या फाइल सामान्य प्रशासन विभागात थांबल्याचा शिक्षकांचा दावा आहे. मात्र, त्यामुळे शिक्षकांची अडचण कायम आहे.

शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेमध्ये कायमस्वरूपी शिक्षक पदोन्नतीचे प्रस्ताव असो वा वैयक्तिक विविध प्रकारची प्रकरणे असोत शिक्षण विभागाने प्रस्तावित केलेल्या अनेक संचिका दीर्घकाळ सामान्य प्रशासन विभागात अडलेल्या आहेत. संचिकांमध्ये त्रुटी काढून वारंवार परत शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येतात. यामुळे शिक्षकांचे विविध प्रकारचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहत आहेत. जिल्हा परिषदेच्या पदोन्नती प्रकरण मागील दोन अडीच वर्षांत चर्चेचा विषय झाला आहे.

विविध शिक्षक संघटनांनी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद समोर आंदोलने करून लक्ष वेधले. त्यानंतर विभागीय आयुक्त, शिक्षण उपसंचालक, स्थानिक आमदार मंत्री यांच्याकडे निवेदन सादर करून दाद मागितली तेव्हा जिल्हा परिषद विस्तार अधिकारी पदोन्नती पाठोपाठ मागील पंधरा ते वीस दिवस झाले.

मुख्याध्यापक पदोन्नतीच्या संचिका मान्यतेसाठी प्रस्तावित केली. ही संचिका वेळेत निकाली काढण्यासाठी प्रशासनाला वेळ लागत असल्याने पदोन्नतीच्या फाइल दोन ते तीन आठवडे झाले, तरी विभागातच थांबल्याचे या सूत्रांनी सांगितले. शिक्षण विभागात विचारणा केल्यानंतर पदोन्नतीच्या फाइल सामान्य प्रशासनातून अद्याप आलेल्या नाहीत, असे सांगण्यात आले.

दप्तर दिरंगाईमुळे पदोन्नती असो की वैयक्तिक प्रश्नांची सोडवणूक असो, न्याय हक्कांपासून वर्षानुवर्षे शिक्षकांना अन्याय सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासक विकास मीना यांनी या प्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

शिक्षकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक संचिकाचा निपटारा वेळेत व्हावा यासाठी सामान्य प्रशासनाने व खातेप्रमुख यांनी गतिमान व्हावे, सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संचिकाचा निपटारा वेळच्या वेळी करावा; तरच शिक्षकांना दिलासा मिळेल.
– दिलीप ढाकणे, संस्थापक, आदर्श शिक्षक समिती

Source link

Career NewsEducation Departmenteducation newshead teacherMaharashtra TimesPromotionZilla Parishadमुख्याध्यापक पदोन्नतीसंचिका रखडल्या
Comments (0)
Add Comment