कुठंही जायची गरज नाही, घरात बसून ठीक करू शकता आयफोनची बॅटरी, पाहा टिप्स

नवी दिल्ली:iPhone Care : जेव्हा जेव्हा ॲपल आयफोनचं नाव निघतं तेव्हा लगेचच त्याची स्टाईल, डिझाईन, दमदार फीचर्स, भारी कॅमेरा हे सगळ डोळ्यासमोर येतं आणि या सर्वात आयफोन इतर फोन्सच्या तुलनेत भारीच ठरतो. पण जेव्हा बॅटरी लाइफचा विचार केला जातो तेव्हा आयफोन त्यात अनेकदा मार खातो. हा आयफोनची बॅटरी चार्ज लगेच होत असली तरी तितक्याच वेगाने उतरते देखील… पण आता तुम्हाला त्याची अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण आता काही नवीन पद्धती देखील आल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही आयफोनची बॅटरी लाइफ सहज घरबसल्या वाढवू शकता.

जर तुम्हालाही तुमच्या आयफोनची बॅटरी फास्ट स्पीडने संपण्यापासून रोखायचं असेल तर तुमच्या iPhone मध्ये दिलेला लो पॉवर मोड यामध्ये सर्वात प्रभावी आहे. हे प्रत्येक वापरकर्त्यासाठी कंपनीने स्वतः दिले आहे, विशेषत: अशा वापरकर्त्यांसाठी ज्यांना अधिक काळ बॅटरी वाचवायची गरज पडते. लो पॉवर मोड सक्रिय करण्यासाठी, तुम्ही प्रथम सेटिंग्जवर जावं लागेल. त्यात बॅटरीचा ऑप्शन सिलेक्ट करुन त्यानंतर लोअर पॉवर मोडवर जाऊन तो सक्रिय करावा लागेल.

आयफोनच्या बॅटरीमध्ये तापमान हा देखील महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे आयफोन असणाऱ्या परिसरात तापमानाची झपाट्याने घट किंवा वाढ देखील टाळली पाहिजे. तसंच परिस्थितीत, तुम्हाला बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्याची गरज नाही, म्हणजे १०० टक्के चार्ज किंवा अगदी ० टक्क्यांपर्यंत पूर्ण उतरवण्याची गरज नाही. या दोन्ही प्रकरणांमध्ये बॅटरीचं तापमान अगदी जास्त किंवा अगदी कमी होतं. फास्ट चार्जरही बॅटरीची लाईफ कमी करण्यात कारणीभूत असतो. त्याच्यामुळे अर्थात वेळेची बचत होते, पण बॅटरी खूप वेगाने चार्ज केल्याने त्याचा वाईट परिणाम होतो.

नोटिफिकेशनमुळेही उतरते बॅटरी

आयफोनमध्ये वारंवार नोटिफिकेशन येत असल्याने देखील बॅटरी पटापट उतरते. त्यामुळे तुम्ही कोणताही सोशल मीडिया वापरत असाल, तर त्यांचे अपडेट्स स्क्रीनवर उपलब्ध असतात, परंतु यामुळे बॅटरी सामान्यपेक्षा जास्त वेगाने संपते. तुम्ही हे नको असलेले नोटिफिकेशन बंद केल्यास, तुमची बॅटरी जास्त काळ टिकेल. हे बंद करण्‍यासाठी, तुम्‍हाला प्रथम सेटिंग्‍जवर जावे लागेल, नंतर नोटिफिकेशन्सच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही हवं त्या ॲपनुसार नोटिफिकेशन बंद करु शकता.

वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Source link

apple service centrebattery repairiPhoneiPhone careiphone repairआयफोनआयफोन बॅटरीॲपल आयफोन
Comments (0)
Add Comment