जिल्हा परिषदेत विविध खात्यांतील ८९९ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. नोकरभरतीसाठी स्वत: जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका तयार करणार असून, परीक्षा एजन्सीद्वारे होणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित एजन्सीला अभ्यासक्रमाचे पॅटर्न दिले जाणार आहेत. भरती प्रक्रिया ऑनलाइनद्वारे होणार असून, यातील कोणतीही प्रश्नपत्रिका ‘लिक’ होणार नाही, अशा पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया होणार आहे.
काही वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची भरतीसाठी इंडियन बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएस या संस्थेशी करार केला आहे. या एजन्सीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र या एजन्सीने यापूर्वी घेतलेल्या प्रश्नपत्रिकेवर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
जिल्हा परिषदेत ३४ विभागांतील कर्मचाऱ्यांची भरती होणार असून, त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. मात्र, प्रश्नपत्रिका योग्य पद्धतीने व त्या पदासाठी पूरक असणे क्रमप्राप्त आहे.
भरतीसाठीची प्रश्नपत्रिका ‘आयबीपीएस’ या एजन्सीद्वारे सेट केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना अभ्यासक्रमाची पद्धत, पॅटर्न दिला जाणार आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार होतील. परीक्षेच्या पाच मिनिटांपूर्वी प्रश्नत्रिका संबंधित केंद्रावर पोहोचणार आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका लिक होणार नसल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व सीबीएसई बोर्डाच्या शाळांना त्यांची सर्व माहिती ‘अपलोड’ करण्याची सूचना दिली होती. मात्र, अद्याप ५७ शाळांनी ही माहिती भरलेली नाही. त्यामुळे या शाळांना नोटीस पाठवली असून, त्यांनी तातडीने माहिती भरावी लागेल.
– आयुष प्रसाद,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद