नवीनच्या म्हणण्यानुसार, त्याने याच वर्षी १३ फेब्रुवारी, २०२३ ला Redmi Note 12 Pro खरेदी केला होता. दरम्यान १२ एप्रिल रोजी संध्याकाळी नवीन त्याच्या शेतात काम करत होता आणि फोन त्याच्या शर्टच्या वरच्या पॅकेटमध्ये ठेवला होता. अचानक फोनने पेट घेतला. नवीनने लगेच खिशातून फोन काढला आणि बाहेर फेकला. त्याला शारीरिक इजा झाली नाही, पण फोन जळून राख झाला. या घटनेनंतर त्याने रेडमी इंडियाच्या कस्टमर केअरशी संवाद साधला पण त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आता नवीनने Xiaomi India विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा कंपनीला दिला आहे. Redmi India च्या ग्राहक समर्थनाने नवीनच्या पोस्टला उत्तर दिले आहे आणि संपूर्ण तपशील मागितला आहे, पण Redmi कंपनीकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही माहिती आलेली नाही.
कशी घ्याल फोनची काळजी?
फोनचा स्फोट होण्यामागे किंवा आग लागण्यामागे फोनची बॅटरी खराब होणं मोठं कारण आहे. त्यामुले काही सोप्या गोष्टी तुम्ही हे टाळू शकता. जसंकी फोनची बॅटरी खराब झाली आहे हे आधीच ओळखा. फोनच्या बॅकपॅनलचा आकार अधिक जाड होण, पॉपिंग येणं, याने तुम्ही हे ओळखू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही फर्स्ट-पार्टी चार्जर वापरत आहात का नाही हे देखील पाहावं. फोन पाण्यापासून दूर ठेवत आहात याचीही खात्री करा, फोन खूप गरम असताना चार्ज करू नका. तसंच लक्षात ठेवा चार्जिंग दरम्यान फोनमध्ये जड काम करू नका. चार्जिंगच्या वेळी चित्रपट पाहणे आणि जास्त वेळ गेम खेळणे घातक ठरू शकते आणि तुमच्या बॅटरीचे तापमान वाढू शकते.
वाचा : Smartphone Explode : हीच ‘ती’ ८ कारणं ज्यामुळे स्मार्टफोनचा स्फोट होतो, ‘अशी’ घ्या काळजी