फ्लिपकार्टचा सेलमध्ये ८० टक्क्यांपर्यंत बंपर डिस्काउंट, ‘या’ दिवसापासून सुरु होणार सेल

नवी दिल्ली : Flipkart big saving days sale : आजकाल सर्वकाही ऑनलाईन उपलब्ध आहे. आधी मोबाईल , लॅपटॉपसारख्या महागड्या वस्तू ऑनलाईन घेण्यापासून लोक घाबरत होते. पण आता फ्लिपकार्टसारख्या साईट्सनी ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण केल्यामुळे लोकही सर्रास ऑनलाईन खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे या ऑनलाईन साईट्स देखील नवनवीन ऑफर्स घेऊन येत आहेत.

फ्लिपकार्टदेखील आपला अपकमिंग सेल लवकरच घेऊन येत आहे. बिग सेविंग डेजना ५ मे पासून सुरुवात होत असून १० मे पर्यंत हा सेल लाईव्ह असेल. यादरम्यान अगदी ८० टक्क्यांपर्यंत सूट ही ग्राहक मिळवू शकणार आहेत. तसंच एक प्रोडक्ट घ्या एक मोफत मिळवा ही ऑफरही असणार आहे. कंपनीने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. तर या सेलमधील काही डील्सबद्दल स्वत: कंपनीनं सांगितलं असून चलातर जाणून घेऊन काही खास डील्सबद्दल…

वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

फ्लिपकार्टच्या खास ऑफर्स
फ्लिपकार्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या काही गोष्टींवर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या लॅपटॉप्सवर फ्लिपकार्टसेलमध्ये ऑफर ठेवली आहे. १४,९९० रुपयांपासूनही लॅपटॉप उपलब्ध असणार आहेत. तसंच प्रिंटर आणि मॉनिटर या गोष्टी अगदी २,१९९ रुपयांपासून मिळणार आहेत. याशिवाय कंपनी ग्रूमिग आणि स्टायलिंग प्रोडक्ट्सवरही भारी ऑफर देत असून अगदी ३९९ पासून हे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. एसडी कार्ड, पेन ड्राईव्ह यासर्वांवर ६० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तसंच टीव्हीवर देखील ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तसंच काही खास रेफ्रिजेटर्सवर ५५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
याशिवाय होम अप्लायसेंसवर ७० टक्क्यापर्यंत सूट मिळणार असून या सेलमध्ये किचन अप्लायसेंस अगदी २९९ रुपयांपासून मिळणार आहेत. या सर्वासह फॅशन, फूड, स्पोर्ट्स प्रोडक्ट्सवरही चांगली सूट या सेलमध्ये मिळणार आहे.

वाचाः Whatsapp खास नवं फीचर, एक Whatsapp अकाउंट चार फोनमध्ये वापरता येणार

Source link

flipkartflipkart big saving daysflipkart dealsflipkart saleफ्लिपकार्टफ्लिपकार्ट सेल
Comments (0)
Add Comment