Jio आणि Airtel रिचार्ज प्लान महाग होणार, पाहा कधीपासून जास्त पैसे मोजावे लागणार

नवी दिल्लीःJio Airtel Price Hike: टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनी आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ करणार आहे. परंतु, जिओ आणि एअरटेल आपल्या प्लानमध्ये किती वाढ करणार आहे, यासंबंधी अद्याप वेगवेगळी माहिती समोर आली आहे. यानुसार, जिओ आणि एअरटेलच्या प्लानमध्ये १० टक्के वाढ केली जाऊ शकते. म्हणजेच २०० रुपयाचा प्रीपेड प्लानची किंमत आता २२० रुपये होईल. तसेच १ हजार रुपयाचा प्लान आता ११०० रुपये होईल.

कधीपर्यंत रोलआउट होणार नवीन रिचार्ज प्लान
जिओ आणि एअरटेलकडून वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत रिचार्ज प्लान महाग केले जाऊ शकतात. याचाच अर्थ डिसेंबर किंवा जानेवारी दरम्यान जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज प्लान महाग केले जाऊ शकतात. एअरटेल आणि जिओ नंतर वोडाफोन आणि बाकीच्या टेलिकॉम कंपन्या सुद्धा आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमती वाढवू शकतात. एअरटेल आणि जिओच्या ४ जी रिचार्ज प्लान महाग होणार असल्याने ५जी रिचार्ज प्लानला लाँच केले जाऊ शकते.

वाचाः Airtel 5G : एअरटेल युजर्ससाठी गुड न्यूज! ३,००० शहरांमध्ये सुरु झाली 5G ची सुविधा

कोणती कंपनी देत आहे ५जी सर्विस
सध्या भारतात फक्त दोन कंपन्या एअरटेल आणि जिओ कडून ५जी सर्विस ऑफर केली जात आहे. जी पूर्णपणे फ्री आहे. दोन्ही कंपन्या आपल्या ५जी डिव्हाइस ठेवणाऱ्या यूजर्सला फ्री मध्ये अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर करीत आहे. एअरटेलने जवळपास ३ हजार हून जास्त शहरात आणि ग्रामीण भागात ५जी सर्विस पोहोचवली आहे. एअरटेल नॉन स्टँडअलोन ५जी नेटवर्क सिस्टमवर काम करीत आहे. तर जिओ स्टँडअलोन नेटवर्क सिस्टमवर काम करीत आहे.

वाचाः पहिल्यांदा इतका स्वस्त मिळतोय Asus चा हा लॅपटॉप, पाहा बंपर डिस्काउंट ऑफर

कसा घ्याल फ्री ५जी लाभ
जर तुम्हाला ५जी सर्विसचा वापर करायचा असेल तर तुमच्याकडे ५जी स्मार्टफोन असायला हवा. सोबत कमीत कमी २४९ रुपयाचा रिचार्ज करणे गरजेचे आहे.

वाचाः नशीब जीव वाचला! Redmi Note 12 Pro जळून खाक, दोन महिन्यापूर्वी फोनची खरेदी

Source link

airtel price hikeJio Airtel Price HikeJio Price Hikeएअरटेल रिचार्जजिओ प्लान महागणाररिचार्ज प्लान महागणार
Comments (0)
Add Comment