किसी का भाई किसी की जान सिनेमा २१०४ मध्ये प्रदर्शित झालेल्या अजित यांचा सिनेमा वीरम या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. बुधवारच्या तुलनेत या सिनेमानं गुरुवारची कमाई १७ टक्क्यांहून कमी आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार सातव्या दिवशी किसी का भाई किसी की जान सिनेमानं सुमारे ३.२५ कोटी रुपये कमावले. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सातव्या दिवशीची एकूण कमाई ८५.५० कोटी रुपये झाली आहे. या सिनमाचं बजेट १५० कोटी रुपये आहे. सिनेमा हिट ठरण्यासाठी १५५ कोटी रुपयांची कमाई होणं अपेक्षित आहे. सध्या तरी सिनेमाच्या कमाईचा वेग पाहता १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहचण्यासाठी सिनेमाला दुसऱ्या आठवड्याची वाट बघावी लागणार आहे.
दिवस कमाई
- शनिवार(दुसरा दिवस) २४ कोटी रुपये
- रविवार (तिसरा दिवस) २४.५० कोटी रुपये
- सोमवार (चौथा दिवस) ०९.५० कोटी रुपये
- मंगळवार (पाचवा दिवस) ६.२५ कोटी रुपये
- बुधवार (सहावा दिवस) ४.२५ कोटी रुपये
- गुरुवार (सातवा दिवस) ३.२५ कोटी रुपये (अनुमानित)
- एकूण कमाई (सोर्स: BoxOfficeIndia) ८५.५० कोटी रुपये
१०० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी प्रतीक्षा
सलमान खान शिवाय या सिनेमात अनेक प्रसिद्ध कलाकारआहेत. त्यात पूजा हेगडे, वेंकटेश, जगपती बाबू, शहनाज गिल, राघव जुयाल, जस्सी गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, विनाली भटनागर आणि भूमिका चावला यांच्याशिवाय विजेंद्र सिंह आणि अभिमन्यू सिंह हे कलाकार आहेत. सिनेमाला या आठवड्याअखेरीस लागून येणाऱ्या चार सुट्ट्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन २ सिनेमामुळे किसी का भाई… सिनेमाच्या कमाईवर होण्याची शक्यता आहे. याशिवाय या शुक्रवारी नमाशी चक्रवर्ती याचा पहिला सिनेमा बॅड बॉय हा प्रदर्शित होणार आहे. पण त्याचा परिणाम सलमानच्या सिनेमावर होणार नाही हे नक्की.
१०० कोटी मिळवले तर..
किसी का भाई किसी की जान हा सिनेमा ४५०० स्क्रीनवर प्रदर्शित झाला. परंतु शुक्रवारी दोन नवीन सिनेमे येणार असल्यानं सिनेमागृहांच्या संख्या कमी झाली. या सिनेमाची अवस्था तू झुठी मैं मक्कार सारखी झाली आहे. दोन्ही सिनेमांचं बजेट सारखेच होते. किसी का भाई किसी की जान सिनेमा दुसऱ्या आठवड्यात १०० कोटींच्या क्लबमध्ये सहजपणं प्रवेश करेल हे नक्की. त्याचप्रमाणं हा सलमानचा १६ वा सिनेमा असेल जो १००,२०० आणि ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल.
युपी आणि बिहारमध्ये घसघशीत कमाई
किसी का भाई किसी की जान सिनेमानं मोठ्या शहरांमधील मल्टीप्लेक्सन नाही तर सिंगल स्क्रीनमधून झाली आहे. युपी, बिहार या राज्यांशिवाय निजाम, आंध्रप्रदेश इथं ही यासिनेमानं चांगली कमाई केली आहे. मोठ्या शहरांमधून सिनेमानं फारशी कमाई केलेली नाही.