नवी दिल्ली :ChatGPT incognito mode : प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी OpenAI ने चॅट जीपीटी (Chatgpt) हे AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स लॉन्च केलं आणि तेव्हापासून जगभरात या प्रणालीला तुफान पसंती मिळू लागली. ChatGPT चे फायदे तर अनेक आहेत, पण यात अजून सुधार करण्यासाठी कंपनी काम करत असून आता कंपनीने ChatGPT साठी ‘incognito mode’ आणला आहे. याचा अर्थ आता तुम्ही चॅटबॉटला काहीही विचारू शकता. कोणीही तुमचे प्रश्न किंवा क्वेरी ट्रॅक करू शकणार नाही. ‘incognito mode’ सुरू केल्यामुळे हिस्ट्री देखील सेव्ह केली जाणार नाही. एकूणच, वापरकर्त्यांची प्रायव्हसी अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.सहसा वेब ब्राउझरमध्ये ‘incognito mode’ आढळतो. वापरकर्ते खाजगी सर्फिंगसाठी हा मोड वापरतात. इंटरनेटवर कोणाला माहीत नसलेली एखादी गोष्ट शोधायची असेल, तर त्यासाठी ‘इनकॉग्निटो मोड’ वापरला जातो. चॅटजीपीटीमध्येही हे फीचर आल्यामुळे त्यातही युजर्सची प्रायव्हसी मजबूत होईल. याशिवाय कंपनीने चॅट हिस्ट्री बंद करण्याचा ऑप्शनही जारी करणार आहे.
इटलीमध्ये ChatGPT वर बंदी
तर ChatGPT मध्ये युजर्सचा डेटा गोळा केला जातो. लाखो वापरकर्त्यांकडून डेटा संकलित करून चॅटजीपीटी आणि इतर एआय चॅटबॉट्स आणखी सुधारले जात आहेत. पण परवानगीशिवाय वापरकर्त्यांचा डेटा सेव्ह करण्यासाठी ChatGPT वर टीका होत असून त्यावर बंदी घालणारा इटली हा पहिला देश आहे.
इटलीमध्ये ChatGPT वर बंदी
तर ChatGPT मध्ये युजर्सचा डेटा गोळा केला जातो. लाखो वापरकर्त्यांकडून डेटा संकलित करून चॅटजीपीटी आणि इतर एआय चॅटबॉट्स आणखी सुधारले जात आहेत. पण परवानगीशिवाय वापरकर्त्यांचा डेटा सेव्ह करण्यासाठी ChatGPT वर टीका होत असून त्यावर बंदी घालणारा इटली हा पहिला देश आहे.
वाचाःWhatsapp खास नवं फीचर, एक Whatsapp अकाउंट चार फोनमध्ये वापरता येणार
ChatGPT Business लवकरच येणार
OpenAI ने ChatGPT साठी नवीन सबस्क्रिप्शन योजना ‘ChatGPT Business’ देखील सादर केली आहे. कंपनी लवकरच नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही योजना खासकरून अशा व्यावसायिकांसाठी आणली जाईल, ज्यांना डेटावर अधिक नियंत्रण हवे आहे. त्यांच्या बिझनेच्या गरजेनुसार हा मोड तयार केला जाईल.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा