Airtel चं ब्रॉडबँड बसवायचा विचार करताय? ‘हा’ आहे स्वस्तात मस्त प्लान, कमी किंमत फायदे जास्त

नवी दिल्ली :Airtel Xstream Fiber Broadband Plan : आजकाल आपल्या जीवनात इंटरनेट फक्त एक मनोरंजनाची किंवा सोयीची वस्तू राहिली नसून गरजेटी गोष्ट झाली आहे. अगदी मुलांच्या शाळेपासून ते मोठ्यांच्या ऑफिसच्या कामापर्यंत सर्वकाही इंटरनेटवर होत असतं. आता तुम्हीही घरात वायफाय बसवण्याचा विचार करत असाल तर एअरटेलची ब्रॉडबँड सर्व्हिस Airtel Xstream Broadband हा एक चांगला ऑप्शन आहे एअरटेलने अलीकडेच आपल्या या फायबर ब्रॉडबँड सेवेसाठी एक नवीन स्वस्तात मस्त प्लान सादर केला आहे.

२१९ रुपयांच्या या नवीन प्लानला ‘ब्रॉडबँड लाइट’ प्लान असं नाव देण्यात आले आहे. एअरटेल ब्रॉडबँडसाठी उपलब्ध असलेला हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. ही योजना Airtel Xstream Fiber योजना म्हणून लिस्टेड आहे. वेगवान इंटरनेट आणि अनेक वैशिष्ट्यांसह ही योजना ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये एक चांगला बजेट पर्याय शोधत असलेल्या वापरकर्त्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. चला जाणून घेऊया या प्लानबद्दल सर्वकाही…

२१९ रुपयांचा Airtel Xstream Fiber Broadband Plan
एअरटेल एक्सस्ट्रीम ब्रॉडबँड लाइट प्लॅनची किंमत प्रति महिना २१९ रुपये आहे आणि ती फक्त वार्षिक सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध आहे. याचा अर्थ वापरकर्त्यांना योजनेसाठी साइन अप करण्यासाठी एकूण३,१०१ रुपये द्यावे लागतील. प्लानच्या इतर डिटेल्सचा विचार केल्यास, वापरकर्त्यांना 10 Mbps ब्रॉडबँड स्पीड मिळेल. युजर्सना प्लॅनसोबत फ्री राउटर देखील मिळतो.
सध्या समोर येणाऱ्या माहितीनुसार ही नवीन Airtel Broadband Lite योजना फक्त बिहार, उत्तर प्रदेश पूर्व आणि आंध्र प्रदेशमध्ये उपलब्ध आहे आणि त्यात कोणतेही OTT किंवा Live TV फायदे समाविष्ट नाहीत. हा प्लॅन नंतर देशातील इतर शहरांमध्ये उपलब्ध होईल की नाही याबाबत सध्या कोणतेही अपडेट नाही.

Airtel Xstream Broadband च्या इतर योजना
एअरटेल एक्सस्ट्रीम ब्रॉडबँडच्या मूळ प्लानची किंमत प्रति महिना ४९९ रुपये आहे आणि यामध्ये 40 Mbps पर्यंतचा वेग, अमर्यादित इंटरनेट आणि कॉल्स आणि Apollo 24/7, Fastag आणि Wynk Music ची सदस्यता समाविष्ट आहे.
एअरटेल एक्सस्ट्रीम ब्रॉडबँडच्या ७९९ रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, ते तुम्हाला 100 एमबीपीएस स्पीड आणि Xstream प्रीमियम पॅकची सदस्यता देते. तसंच एंटरटेनमेंट प्लॅनची किंमत ९९९ रुपये प्रति महिना आहे आणि यामध्ये 200 Mbps पर्यंतचा वेग आणि Disney+ Hotstar, Amazon Prime आणि Extreme Premium पॅकची सदस्यता मिळते. प्रोफेशनल प्लानची किंमत १,४९८ रुपये प्रति महिना आहे आणि 300 Mbps स्पीड आणि Netflix सबस्क्रिप्शन ऑफर करते. सर्वात महागड्या प्लानची किंमत ३,९९९ रुपये प्रति महिना आहे आणि 1Gbps पर्यंतच्या गतीसह सर्व फायदे समाविष्ट आहेत.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

Source link

Airtelairtel broadbandairtel plansairtel wifiairtel xstreamएअरटेलएअरटेल ब्रॉडबँडएअरटेल वायफाय
Comments (0)
Add Comment