YCMOU Exam: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षेसंदर्भात अपडेट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची उन्हाळी सत्र परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. पहिल्या टप्यात तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल. तर मे महिन्याच्या अंतिम आठवड्यापासून लेखी परिक्षांना सुरुवात होणार आहे.

मे २०२३ उन्हाळी सत्र परीक्षेबाबत मुक्त विद्यापीठाने सूचनापत्र जारी केलेले आहे. यामध्ये परीक्षेतील महत्त्वाच्या टप्यांची माहिती दिलेली आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, प्रोजेक्ट, वर्कबूक, इंटर्नशिप, स्टुडिओ टर्मवर्क, स्टुडिओ मौखिक, तत्सम परीक्षा पहिल्या टप्यात घेतली जाईल. निरंतर शिक्षण विद्याशाखा आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखा अंतर्गत शिक्षणक्रमांची प्रात्यक्षिक परीक्षा ८ ते २८ मे या काळात घेतली जाईल.

तर संबंधित विभागीय केंद्रांना गुण दाखल करण्यासाठी १२ मे ते ९ जून असा कालावधी दिलेला आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण दाखल करण्यासाठी १२ मे ते ९ जून असा कालावधी असेल. निरंतर शिक्षण विद्याशाखेच्या हॉटेल मॅनेजमेंट आणि अभियांत्रिकी या शिक्षणक्रमांची तसेच विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेच्या सर्व शिक्षणक्रमांच्या लेखी अंतिम परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आयोजित केल्या जाणार आहेत.

परीक्षा ऑफलाइनच

प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा या ऑफलाइन पद्धतीनेच पार पडणार आहेत. अभियांत्रिकी शिक्षणक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा या विद्यापीठाने पाठविलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेनुसार ऑफलाइन पद्धतीने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या सर्व अभ्यासक्रमांची प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेपूर्वी अभ्यासकेंद्राने नेहमीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत. या परीक्षांचे गुण मात्र ऑनलाइन पद्धतीने दाखल केले जातील.

Source link

Exam in MayMaharashtra TimesOpen UniversitySummer SessionYashwantrao Chavan Open UniversityYashwantrao Chavan UniversityYCMOUycmou examउन्हाळी सत्र परीक्षायशवंतराव चव्हाण विद्यापीठ
Comments (0)
Add Comment