Elon Musk चा पुन्हा दणका, आता या सर्विससाठी द्यावे लागणार पैसे

नवी दिल्लीःTwitter new Charge: जेव्हापासून एलन मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवली आहे. तेव्हापासून ट्विटर यूजर्सला लागोपाठ पैसे मोजावे लागत आहे. एलन मस्ककडून ट्विटर यूजर्सवर महागाईचा बॉम्ब फोडला आहे. खरं म्हणजे अजूनपर्यंत यूजर्सला ब्लू टिकसाठी मंथली प्लानसाठी कमीत कमी ६५० रुपये द्यावे लागत होते. आता कंपनीने कंटेट सब्सक्रिप्शनवर १० टक्के कपात केली आहे. ट्विटरचे सीईओ एलन मस्कने कंटेंट सब्सक्रिप्शन लागू केले आहे. याच कंटेट सब्सक्रिप्शनमुळे यूजर्सच्या कमाईवर १० टक्के भाग एलन मस्क यांना द्यावा लागणार आहे. एलन मस्क यांनी यूजर्सला एक्सक्लूसिव्ह कंटेंटसाठी चार्ज करण्याची सुविधा दिली आहे. याअंतर्गत प्रति यूजर ४ डॉलर चार्ज केले जाऊ शकते.

यूजर्सला कमाई देण्यावर द्यावा लागेल १० टक्के हिस्सा
सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एक ट्विटर यूजर्स आहे. त्यांच्याकडे कोणताही एक्सक्लूसिव्ह व्हिडीओ किंवा फोटो आहे. त्या व्हिडीओ आणि फोटोला आपल्या ट्विटर अकाउंटच्या कंटेट मॉडरेशन फीचर मध्ये पोस्ट केले जाऊ शकते. जर तुम्हाला त्या फोटोला किंवा व्हिडीओला पाहायचे असेल तर चार्ज द्यावा लागू शकतो. यातून तुम्ही ट्विटरवरून कमाई करू शकता. परंतु, तुमच्या कमाईतील एक हिस्सा १० टक्के ट्विटरला द्यावा लागणार आहे.

वाचाः घरात वायफाय बसवताय? आता वायर्सचं टेन्शन नाही, Jio AirFiber सोबत मिळेल 1Gbps ची स्पीड

सुरुवातीच्या १२ कमाईवर सूट
एलन मस्ककडून ट्विटर वर पोस्ट लिहिण्याची सूट दिली जात आहे. सोबत यूजर्सला हाय क्वॉलिटी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करू शकता. एलन मस्क यांनी कंपनी यूजरच्या कंटेट सब्सक्रिप्शन वर आधी १२ महिन्यांपर्यंत कपात करणार नाही. ट्विटरने गेल्या वर्षी जाहिरातीतील घसरणीनंतर मिळकत वाढवण्यासाठी ट्विटर मध्ये खूप बदल केले आहेत.

वाचाः नवीन नियम, हेडफोन न लावता व्हिडिओ पाहिल्यास ५ हजाराचा दंड, ३ महिन्याची जेलची शिक्षा

वाचाः Whatsapp खास नवं फीचर, एक Whatsapp अकाउंट चार फोनमध्ये वापरता येणार

Source link

Twitter Chargetwitter charged more in india than usTwitter new Chargeट्विटरट्विटर न्यूज
Comments (0)
Add Comment