OnePlus चा 5G फोन घेताय? फ्लिपकार्टवर मिळत आहे तगडी सूट


नवी दिल्ली :
Oneplus 9 5G Phone : आता ५जी फोन्सची मार्केटमध्ये हवा असून लवकरच सर्व फोन हे ५जी असणार आहेत. दरम्यान तुम्हीही एखादा दमदार फीचर्स असणारा ५जी फोन घेण्याचा विचार करत असाल आणि वनप्लससारख्या दमदार कंपनीचा फोन घेणार असाल तर एक बेस्ट ऑप्शन सध्या मार्केटमध्ये आहे. वनप्लस कंपनीचा Oneplus 9 5G हा फोन तगड्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या फोनच्या १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजचा फोनची सध्या किंमत ५४,९९९ रुपये असून सध्या डिस्काउंटसह तो ४३, ९९० रुपयांना मिळत आहे. याशिवाय जर तुम्ही कोटक बँकचं कार्ड वापरणार असाल तर तुम्ही १० टक्के डिस्काउंटसह मिळत आहे. तसंच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड असणाऱ्यांना ५ टक्के डिस्काउंटसह मिळत आहे.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

फिचर्स आणि स्पेसिफिकेन्सचं
या फोनच्या डिस्प्लेचं रेझ्युलेशन 2400×1080 इतकं असून ६.५५ इंचाचा फ्लूइड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या फोनमधअये ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज तसंच १२जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येत आहे. प्रोसेसरचं म्हणाल तर ६६० जीपीयूसोबत स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट हा आहे. फोनच्या कॅमेऱ्याचं म्हणाल तर यामध्ये ४८ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तसंच अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा म्हणाल तर १६ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. आता बॅटरीचं म्हणाल तर 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ती बॅटरी 65T वॉर्प चार्जिंग देण्यात आळी आहे. अँन्ड्रॉईड ११ फोनमध्ये असून Oxygen OS वर काम करतो.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

Source link

5g phoneoneplus 5goneplus 9 5goneplus phonesmartphoneवनप्लसवनप्लस ५जी फोन
Comments (0)
Add Comment