राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट मालक आणि चालक वेळा वाढवून देण्याची मागणी करत आहेत. तसेच मॉलच्या वेळाही वाढवून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. यावर राज्य सरकार गांभिर्याने विचार करत असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही… अजित पवारांचं पंतप्रधानांना मराठीत पत्र
मुंबईत करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आली असून मुंबईत टप्प्याटप्प्याने सर्व काही सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार करत आहे. विरोधकांनी कितीही दबाव टाकला तरी देखील राज्य सरकार हे सर्वांचा विचार करत असल्याचे शेख म्हणाले. आता गणेशोत्सव येत आहे. त्याबाबतही नवी नियमावली तयार करण्यात येत आहे. या सर्व बाबींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष असून ते स्वत: यावर काम करत असल्याचेही शेख म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईत बेस्ट बसला विचित्र अपघात; चाळीच्या मीटर केबिनला आणि रिक्षाला धडक
‘सर्वकाही विरोधकांच्या मनासारखे होणार नाही’
विरोधकांनी कितीही दबाव टाकला तरी देखील सर्वकाही विरोधकांच्या मनासारखे होणार नाही. आम्ही मार्केटदेखील उघडण्याच्या तयारीत आहोत. शाळा उघडण्याबाबतही मागणी होत आहे. या सर्व मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. मात्र जर आपण सर्वच सुरू केले आणि करोनाचे रुग्ण वाढले तर काय करायचे? हे लक्षात घेऊनच सखोल अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे शेख म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- याचा अर्थ काय घ्यायचा? चंद्रकांतदादांना नाही, पण विखेंना मिळाली अमित शहांची भेट
राज्तयात करोनाचा संसर्ग आता नियंत्रणात येत आहे. यात आणखी सुधारणा झाली, तर हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल लवकरच सुरू करता येऊ शकतील. मुंबईचे पालकमंत्री म्हणून आपल्याकडे अनेक तक्रारी आणि मागण्या येत असतात. मात्र हे मुद्द्यांवर टास्क फोर्सशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल असे शेख म्हणाले.