ज्या स्वप्नासाठी रात्रीचा दिवस केला त्यानेच घेतला जीव, स्वतः बनवलेल्या हेलिकॉप्टरची चाचणी करताना तरुणाचा मृत्यू

हायलाइट्स:

  • ज्या स्वप्नासाठी रात्रीचा दिवस केला त्यानेच घेतला जीव
  • स्वतः बनवलेल्या हेलिकॉप्टरची चाचणी करताना तरुणाचा मृत्यू
  • हेलिकॉप्टरने भरारी घेण्याचं स्वप्न राहिलं अर्धवट…

यवतमाळ : आपलं स्वप्न साकारण्यासाठी एका ध्येयवेड्या तरुणाने स्वतः हेलिकॉप्टर तयार केलं. पण हेलिकॉप्टर ची चाचणी करताना त्याचा दुर्दैवानं अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये समोर आली आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांमध्ये दु:खाचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेख इस्माईल उर्फ मुन्ना हेलिकॉप्टर शेख इब्राहिम असं या तरुणाचं नाव आहे. या 24 वर्षीय तरुणाने चक्क हेलिकॉप्टर बनविले होते. तर मागील 2 वर्षापासून इस्माईल हेलिकॉप्टर बनविण्यासाठी कष्ट घेत होता. हळूहळू त्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. इस्माईल हा पत्रकारागिर होता. त्याला एक भाऊ आणि एक बहीण आहे. मोठा भाऊ मुस्सवीर हा गॅस वेल्डर आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून तो सिंगल सीट हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी काम करत होता. हेलिकॉप्टर तयार करून त्यात उंच भरारी घेण्याचं इस्माईलचं स्वप्न होतं. पण याच स्वप्नाने त्याचा जीव घेतल्याची घटना घडली आहे.
व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून जिममध्ये गेले, व्यायाम करताना असं काही झालं की पोलीसाचा जागीच मृत्यू
घर चालवण्यासाठी तो एका वेल्डिंगच्या दुकानात काम करायचा आणि यासोबतच रात्री उशिरा जागत आपलं हेलिकॉप्टर तयार करायचा. हेलिकॉप्टर बनवून पूर्ण झालं होतं आणि याची चाचणी करताना इस्माईलचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला.
दारूची अशी कसली नशा? घरी पिऊन येताच तरुणाने केलं धक्कादायक कृत्य
घरची परिस्थिती जेमतेम इस्माईल हा पत्रकारागिर असल्याने तो अलमारी कुलर असे विविध उपकरणे बनवायचा. इस्माईल हा फक्त ८ वी शिकलेला. पण एक दिवस त्याला काय माहीत कसे सुचले. त्याने चक्क हेलिकॉप्टर बनवायचे ठरवले आणि त्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रवास सुरु झाला. हळूहळू एक एक पार्ट तयार करू लागला.

कसा झाला अपघात?

२ वर्षाच्या प्रयत्नानंतर ११/८/२०२१ ला त्याचे स्वप्न पूर्ण होणार होते आणि १०/८/२०२१ च्या रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरू केले इंजिन ७५० अम्पियरवर फिरत होते. सर्व व्यवस्थित सुरू होते पण अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि त्यामुळे मुख्य फॅनला येऊन धडकला आणि तो फॅन इस्माईलच्या डोक्यात लागला आणि पाहता पाहता सर्व स्वप्न भंग झाले आणि डोक्यावर फॅन लागल्याने इस्माईलचा मृत्यू झाला.
जे स्वप्न उराशी बाळगून इस्माईलने अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळे त्याचा जीव गेल्याने कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे.

Source link

accidental deathhelicopteryavatmal helicopteryavatmal helicopter rideyavatmal news liveyavatmal news live todayyavatmal news todayyavatmal news today marathiyoung man accidental death
Comments (0)
Add Comment