या उपायाने चंद्राच प्रभाव राहील अनुकूल
ज्योतिष शास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या वेळी कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी तुळशीचे पान तोंडात ठेवून बीज मंत्र किंवा चंद्राचा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. ग्रहणाच्या वेळी या मंत्रांचा जप करणे खूप फायदेशीर मानले जाते. असे केल्याने चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव नाहीसा होतो आणि कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होते.
या उपायाने गरिबी होईल दूर
आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चंद्रग्रहणानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे आणि नंतर अन्नदान करावे. काळ्या गाईच्या तुपाचा दिवा लावण्याबरोबरच अखंड ज्योत लावावी. असे केल्याने गरीबी दूर होते आणि संपत्ती मिळण्याची शक्यता असते. तर चंद्रग्रहणाच्या वेळी तांदूळ, दूध, दही, पांढरे वस्त्र, मिठाई इत्यादी पांढर्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.
व्यवसाय वृद्धीसाठी हा उपाय करा
जर व्यवसाय सुरळीत चालत नसेल किंवा काही ना काही अडथळे येत असतील तर चंद्रग्रहणाच्या दिवशी व्यवसायात असलेल्या पूजास्थानी माता लक्ष्मीजवळ गोमती चक्राची विधीवत स्थापना आणि पूजा करावी. यानंतर १६ माळ लक्ष्मी मंत्रांचा जप करा. याउलट गोमती चक्राची स्थापना विधींनी करणे अवघड असेल तर गोमती चक्राला दुधाने शुद्ध करून त्यावर कुंकवाचा टिळा लावावा. त्यानंतर पूजेनंतर पिवळ्या कपड्यात बांधून व्यापारात सुरक्षित ठिकाणी कोणाच्या नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा.
आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी हा उपाय करा
आर्थिक समस्या कायम राहिल्यास आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी कुलूप खरेदी करा आणि ग्रहणाच्या वेळी कुलूप समोर ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कुलूप एखाद्या मंदिरात दान करा. असे केल्याने आर्थिक प्रगतीतील अडथळे दूर होतात आणि रखडलेल्या कामात यश मिळते.
या उपायाने प्रगती होईल
तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा ऑफिसमधील सहकारी आणि अधिकाऱ्यांमुळे तुम्हाला काही समस्या येत असतील तर चंद्रग्रहणानंतर गोड भात बनवून कावळ्यांना खाऊ घाला. असे केल्याने प्रगती होते आणि समस्याही सुटतात असे मानले जाते. तसेच हा उपाय केल्याने शनि, राहू, केतू या अशुभ ग्रहांचे दोषही कमी होतात.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.