Smartphone Care : स्मार्टफोन स्फोटाच्या घटनांमध्ये वाढ! या सोप्या स्टेप्स फॉलो करुन घ्या काळजी

नवी दिल्ली :Smartphone care : आता उन्हाळा सुरु झाला असून उष्णतेची झळ देशभरात बसू लागली आहे. यामुळेच आपल्या सतत सोबत असणारा स्मार्टफोनही जास्त गरम होऊ लागला आहे. दरम्यान स्मार्टफोन तापल्यामुळे आग लागल्याच्या, स्फोट झाल्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईलफोनवर व्हिडीओ पाहताना स्फोट झाल्यामुळे आठ वर्षी मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केरळच्या त्रिशूर येथे नुकतीच घडली. दरम्यान स्मार्टफोनला आग लागण्याची, स्फोट होण्याच्या घटना आजकाल वाढत असल्याने हे टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.तर या स्फोटाच्या घटना बॅटरी खराब झाल्यामुळे अधिक तापल्यामुळेच होतात.बॅटरी कधी ओवरचार्ज झाल्यावरही असं होतं. त्यामुळे अनेकदा जास्त वेळ, रात्ररात्रभर फोन चार्जला लावल्याने फोनची बॅटरी खराब होऊ शकते. तसंच अनेकदा ओरिजनल चार्जरनं चार्ज न करता लोकल चार्जनं चार्ज करणंही धोकादाय ठरु शकतं. तर या सर्वापासून वाचण्यासाठी पुढील सोप्य स्टेप्स तुम्ही फॉलो करु शकता…

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

स्मार्टफोनचा स्फोट होण्यापासून वाचवण्यासाठी…

१. तुमच्या फोनला थेट उन्हापासून किंवा उष्णतेपासून लांब ठेवा. कारच्या डॅशबोर्डवर थेट आणि प्रखर ऊन लागत असल्याने तेथेही स्मार्टफोन ठेवणं टाळा.

२. चार्ज करताना फोन वापरणं टाळा. जास्त उष्णतेच्या ठिकाणी किंवा ऊन असलेल्या ठिकाणी फोन चार्ज करताना वापरणं फारच धोकादायक आहे.

३. कधीही फोन घेताना कंपनीने पुरवलेला ओरिजनल चार्जरच वापरावा. लोकल चार्जर वापरुन ओवरहिंटिगसारख्या बऱ्याच समस्या येऊ शकतात.

४. फोनला ओव्हरचार्जमुळे खूप तोटा बॅटरीला परिणामी फोनला होऊ शकतो. त्यामुळे फोन पूर्ण चार्ज होताच तात्काळ चार्जवरुन काढला पाहिजे.

५.फोन अधिका तापल्यावर तो थंड होईपर्यंत वाट पाहून मगच वापरा. तसंच कायम फोन अप टू जेट ठेवा. तसंच फोन चार्ज करता गर्माठिकाणी ठेवणंही
टाळा.

वाचा : Battery Saver: फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

Source link

smartphone blastSmartphone careSmartphone explodeSmartphone newsस्मार्टफोन केअरस्मार्टफोन स्फोट
Comments (0)
Add Comment