जेफ्री हिंटन यांच्या AI विश्वातील कामगिरीमुळे त्यांना अगदी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे गॉडफादर ही म्हटले जाते. दरम्यान
जेफ्री हिंटन यांनी नुकताच गुगलचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एक दशकाहून अधिक काळ Google मध्ये काम केले आणि AI च्या संबंधित क्षेत्रात त्याचं योगदान उल्लेखनीय आहे. गुगलचा राजीनामा देत त्यांनी एक ट्वीटही केलं. जेफ्री हिंटन म्हणाले, ”आज न्यूयॉर्क टाईम्सचे रिपोर्टर Cade Metz यांनी लिहिलं की मी Google सोडलं जेणेकरून मी Google वर टीका करू शकेन. पण मूळात मी गुगल सोडलं जेणेकरून मी AI च्या धोक्यांबद्दल बोलू शकेन याचा Google वर कसा परिणाम होतो याचा विचार न करता.” या त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी सूचकपणे आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे भविष्यात फार धोके असल्याचंच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता हिंटन आर्टिफिशियल इंटेलिजेन्सबाबत काय वक्तव्य करतील याकडे अनेकांचे लक्ष आहे.
ChatGPT विकसित करण्यात हिंटन यांचा मोठा हात
जेफ्री हिंटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक न्यूरल नेटवर्क विकसित केले होते. २०१२ पासून ते यावर काम करत होते. या नेटवर्कमुळे हजारो प्रतिमांचे विश्लेषण केल्यानंतर, कुत्री, मांजरी आणि फुले यासारख्या सामान्य वस्तू ओळखण्यास तंत्रज्ञानाने सुरुवात केली. याच आधारावर चॅट जीपीटी आणि गुगल बार्ड हे AI Tool तयार केले गेले आहेत कारण ही साधने सखोल विश्लेषणानंतरच गोष्टी ओळखतात. त्यामुळे ChatGPT विकसित करण्यात हिंटन यांचा मोठा हात आहे.
वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो