खरं तर गेल्या आठवड्यात लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे सिनेमाच्या कलेक्शनकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.परंतु आठवड्याअखेरीस या सिनेमानं फारशी समाधानकारक कमाई केली नाही. त्यामुळे सोमवारी सिनेमाचं कलेक्शन फार होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाची सुट्टी असल्यानं त्याचा फायदा सिनेमाला झाला. शुक्रवारी किसी का भाई किसी की जान सिनेमानं २.१५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर सोमवारी सिनेमानं २.२५ कोटी रुपयांची कमाई करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
बॉक्स ऑफिस इंडियानं दिलेल्या रिपोर्टनुसार सोमवारी या सिनेमानं देशातून महाराष्ट्रातून सर्वाधिक कमाई केली. सोमवारी या सिनेमा २.२५ कोटी रुपयांची कमाई केली. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात आतापर्यंत ११.७५ कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे. यातील जास्त कमाई गेल्या तीन दिवसांतील आहे. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाची एकूण कमाई १५-१६ कोटी रुपयांची कमाई करेल असा अंदाज आहे. ११ दिवसांमध्ये या सिनेमानं आतापर्यंत ९७.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सिनेमाची कमाई
‘किसी का भाई किसी की जान’ ने पहिल्या आठवड्यात ८५.६० कोटी रुपये
‘किसी का भाई किसी की जान’ नं दुसऱ्या आठवड्यात ११.६५ कोटी रुपये (४ दिवस)
११ दिवसांमध्ये ‘किसी का भाई किसी की जान’ का टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन- ९७.२५ कोटी रुपये
सिनेमाच्या कमाईत होणार घट?
किसी का भाई किसी जान सिनेमा पाहून सलमानचे चाहते निराश झाले आहेत. खरं तर सिनेमात चांगले कलाकार असूनही त्यात फार दम नाही. ईदच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला. मात्र सलमानचा सिनेमा असूनही त्याला फार यश मिळालं नाही. गेल्या १३ वर्षांतील सलमानचा हा सगळ्यात मोठा अपयशी सिनेमा ठरला आहे. आता सोमवार नंतर मंगळवारी या सिनेमाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण या आठवड्यात सुट्टी नाही. अर्थात या आठवड्यात कोणताही बिग बजेट सिनेमा प्रदर्शित होत नसल्यानं त्याचा फायदा कदाचित सलमानच्या या सिनेमाला मिळू शकतो. तर देखील मंगळवारीहा सिनेमा किमान १ कोटी रुपयांहून अधिक कमाई करण्याचा अंदाज आहे.
दरम्यान किसी का भाई किसी की जान या सिनेमात सलमान खानशिवाय पूजा हेगड़े, वेंकटेश, जगपति बाबू, भूमिका चावला, शहनाज गिल, राघव जुयाल, पलक तिवारी, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, विनाली भटनागर आणि विजेंद्र सिंह हे कलाकार आहेत. १५० कोटी रुपये बजेट असलेल्या या सिनेमानं वर्ल्ड वाईड पातळीवर ११ दिवसांत १७२ कोटी रुपये कमावेल आहेत. या सिनेमानं ११ दिवसांत परदेशात ५१कोटी रुपये कमावले आहेत. तर देशात १२१ कोटी रुपये कमावल्याची माहिती sacnilk नं त्यांच्या अहवालात दिली आहे.