मॉल, थिएटर खुले होणार? राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू

हायलाइट्स:

  • सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू
  • करोना निर्बंध आणखी शिथील होण्याची शक्यता
  • मॉल, थिएटर काही अटींसह खुले होण्याची शक्यता

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री शासकीय अतिथीगृहावर सुरू झाली आहे. राज्यात करोनाचे निर्बंध हळूहळू शिथील होत आहेत. लोकल ट्रेन प्रवासाला १५ ऑगस्टपासून काही अटींसह परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हॉटेल, मॉलवरील निर्बंध अजूनही कायम असून चित्रपटगृहे अद्यापही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याबाबत काय निर्णय होणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे. (Maharashtra Cabinet Meeting)

करोनाचे निर्बंध राज्यात सध्या शिथील होत आहेत. मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या लोकल ट्रेन प्रवासालाही लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मासिक पास देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, जलतरण तलाव, जीम व चित्रपटगृहे, नाट्यगृहे अद्याप बंद आहेत. हॉटेल्स, मॉलवर वेळेचे निर्बंध आहेत. त्यामुळं अर्थचक्र म्हणावे तसे गतीमान झालेले नाही. रोजगाराचा प्रश्नही कायम आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना या सर्वच ठिकाणी परवानगी द्यावी, अशी एक मागणी पुढं आली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी तसे संकेत दिले होते. त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

लाच प्रकरण: ACB चौकशीनंतर घरी परतलेल्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर फरार

सणासुदीचा श्रावण महिना सुरू झाल्यानं मंदिरं उघडण्यासाठीही सरकारवर दबाव येत आहे. भाजपनं ही मागणी लावून धरली आहे. त्यामुळं त्याबाबतीतही निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात, तिथं लस हा निकष ठेवता येणे अशक्य असल्यानं मंदिरं उघडण्यास परवानगी दिली तर ती कशी दिली जाणार, याविषयी उत्सुकता आहे.

पूरग्रस्त भागांतील मदतीबाबत निर्णय होणार

पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील सहा जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे कितपत झाले आहेत. पूरग्रस्तांना मदत पोहोचली आहे का? आणि पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम व्यवस्थित सुरू आहे का याचाही बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यानुसार आर्थिक मदतीची नव्यानं घोषणा होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारची पुढील दिशा काय असेल, यावरही खल होण्याची शक्यता आहे.

वाचा: …तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही; अजित पवारांचं पंतप्रधानांना मराठीत पत्र

Source link

coronavirusmaharashtra cabinet meetingMaharashtra Cabinet Meeting Latest NewsMaharashtra Cabinet Meeting Todaymaharashtra unlockMalls-Theatres UnlockUddhav Thackerayउद्धव ठाकरेराज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू
Comments (0)
Add Comment