कसे काम करणार नवीन फेस रिकग्निश पेमेंट सर्विस
यासाठी तुम्हाला एअरटेल पेमेंट बँक खाते ओपन करावे लागेल. यानंतर ग्राहकांना आधार नंबर आणि फेस दाखवून पेमेंट करता येईल. यासाठी एअरटेलने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI सोबत पार्टनरशीप केली आहे. ही बँकेच्या आधारावर इनेबल्ड पेमेंट सर्विस आहे.
वाचाः Mobile Recharge : स्वस्तात मस्त प्रीपेड प्लान्स, कॉलिंगसह डेटा प्लानमध्ये कोणते रिचार्ज आहेत बेस्ट, पाहा यादी
फिंगरप्रिंट मॅच करण्याची गरज नाही
एअरटेल पेमेंट बँकेतून यूजर्सला मिनी स्टेटटमेंट आणि बँक बॅलेंसची माहिती मिळू शकते. सोबत चेहरा दाखवून ऑनलाइन पेमेंट सुद्धा करता येईल. सर्वात खास बाब म्हणजे जर तुम्ही एअरटेल पेमेंट बँकेत अकाउंट नसेल तर तुम्ही NPCI च्या गाइडलाइन अंतर्गत पैशांची देवाण घेवाण करू शकाल. परंतु, फेस रिकग्निशन सोबत ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आधार कार्ड नंबर द्यावा लागेल. यामुळे बँक यूजर्सला व्हेरिफाय करू शकतील. या सुविधेचा लोकांना फायदा मिळेल. ज्यांना बँकेत वारंवार फिंगरप्रिंट मॅच करण्याचा कंटाळा येतो.
नोटः एअरटेल या प्रकारची सर्विस ऑफर करणारी चौथी बँक आहे. याआधी आधार आणि फिंगरप्रिंट स्कॅन करून पेमेंट करण्याची सुविधा दिली जात होती.
वाचाः चूकीच्या UPI ID वर केलं पेमेंट, घाबरु नका, ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा संपूर्ण रिफंड