Amazon वर iPhone 14 वर किती सूट?
आयफोन 14 च्या बेस व्हेरिएंटची किंमत ७९,९०० रुपये आहे, परंतु हा फोन Amazon वर ७१,९९९ रुपयांच्या डिस्काउंटसह विक्रीसाठी ठेवला आहे. त्याच वेळी, ग्राहकांना HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर अतिरिक्त ४००० रुपयांची सूट देखील मिळेल, ज्यामुळे किंमत ६६,९९९ रुपयांपर्यंत खाली येईल. ग्राहक त्यांच्या जुन्या स्मार्टफोनला एक्सचेंज करुन २२,६८८ रुपयांपर्यंत अधिक सूट देखील मिळवू शकतात.
Flipkart वर iPhone 14 वर किती सूट?
Apple iPhone 14 ची किंमत Flipkart वर ७९,९०० रुपये आहे, पण डिस्काउंटेड प्राईस ६९,९९९ रुपये इतकी खाली आली आहे. ग्राहक त्यांच्या जुन्या स्मार्टफोनला करून एक्सचेंज करुन २९,२५० रुपयांपर्यंत आणखी बचत करू शकतात. तसंच Flipkart HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर ४००० रुपयांची अतिरिक्त झटपट सूट देखील देत आहे, ज्यामुळे फोनची किंमत ६५,९९९ रुपयांपर्यंत खाली जाईल.
क्रोमा वर iPhone 14 किती सूट?
आयफोन क्रोमा स्टोअर मधून खरेदी केल्यास ७१,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. त्याच वेळी, फोन HDFC बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर यावर खरेदी केल्यास आणखी ४००० रुपयांची अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे. म्हणजेच, डिस्काउंटसह, iPhone 14 ६७,९९९ रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल.
विजय सेल्समध्ये iPhone 14 वर किती सूट?
७९,९०० रुपये किमतीचा iPhone 14 विजय सेल्समध्ये ७०,९०० रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्राहकांनी त्यांच्या HDFC बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरल्यास, किंमत ६६,९०० रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.
Apple Store मध्ये आयफोन 14 कितीला?
Apple Store मध्ये या iPhone ची किंमत ७९,९०० रुपये आहे. त्याच वेळी, ग्राहकांना HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने केलेल्या खरेदीवर ४००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. म्हणजेच, डिस्काउंटसह, iPhone 14 ७४,९०० रुपयांना खरेदी करता येईल.
आयफोन 14 चे स्पेसिफिकेशन
iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये A15 Bionic चिपसेट आणि 512 GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सेलच्या प्राथमिक लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा आहे. दुसरी लेन्सही १२ मेगापिक्सल्सची आहे. समोर १२-मेगापिक्सल कॅमेरा देखील आहे. कॅमेरा HDR व्हिडिओसह 4K रेकॉर्डिंग आणि डॉल्बी व्हिजनसाठी सपोर्ट आहे.
वाचाः Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट