वादळामुळे लदाखच्या आकाशात अरोराही चमकल्याचं दिसून आलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करताना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (IIA) यांनी सांगितलं की, २२-२३ एप्रिलच्या रात्री अरोरा 360-डिग्री कॅमेऱ्यात हे सर्व कैद झालं. ही एक दुर्मिळ घटना असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
पाहा VIDEO-
Aurora म्हणजे नक्की काय?
तर ऑरोरा हा आकाशातील एक सुंदर नैसर्गिक प्रकाश आहे. हे सहसा रात्रीच्या वेळी उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ दिसतो. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जेव्हा सौर वारा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी संबंध साधतो तेव्हा हे ऑरोरा तयार होतात. दरम्यान सूर्यावरुन उठलेल्या वादळानंतर तयार झालेला पृथ्वीवरील ऑरोरा भारताव्यतिरिक्त युरोप आणि चीनमध्येही दिसून आला. दरम्यान IIA चे प्रोफेसर मिश्रा सांगतात की, असे तीव्र भूचुंबकीय वादळ शेवटचे 2015 मध्ये आले होते.
कोरोनल मास इजेक्शन (CME) म्हणजे काय
कोरोनल मास इजेक्शन किंवा CME हे सौर प्लाझ्माचे मोठे ढग असतात. सौर स्फोटानंतर हे ढग सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रामुळे अवकाशात पसरतात. अंतराळातील त्यांच्या परिभ्रमणामुळे त्यांचा विस्तार होतो आणि अनेकदा ते अनेक दशलक्ष मैलांचे अंतर गाठतात. कधीकधी ते ग्रहांच्या चुंबकीय क्षेत्राशी देखील आदळतात. जेव्हा त्यांची दिशा पृथ्वीकडे असते तेव्हा ते भू-चुंबकीय अडथळा आणू शकतात. यामुळे उपग्रहांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन पॉवर ग्रीडवर परिणाम होऊ शकतो.
वाचाः Mobile Recharge : स्वस्तात मस्त प्रीपेड प्लान्स, कॉलिंगसह डेटा प्लानमध्ये कोणते रिचार्ज आहेत बेस्ट, पाहा यादी