बुध प्रदोष व्रताला सौभाग्याच्या वस्तूंचे दान करा
जे बुध प्रदोषच्या दिवशी व्रत करतात किंवा उपवास करत नाहीत, त्यांनी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी विधीवत भगवान शंकराची पूजा करावी. महिलांनी माता पार्वतीची पूजा करावी आणि सौभाग्याचे साहित्य गरजू महिलेला दान करावे. असे केल्याने तुमच्या कुटुंबात आनंद राहतो आणि तुम्ही नेहमी भाग्यवान राहता.
बुध प्रदोष व्रताला या मंत्राचा जप करा
जर तुमच्या कुंडलीत बुधाशी संबंधित दोष असतील किंवा बुध ग्रहाला अनुकूल बनवायचे असेल तर बुध प्रदोष दिवशी बुध ग्रहाचा मंत्र ‘ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः’ चा ९००० वेळा जप करा. जर एका दिवसात जप पूर्ण करणे शक्य नसेल तर बुध प्रदोषापासून मंत्राचा जप सुरू करा आणि ९ दिवसाच्या आत तो पूर्ण करा.
बुध हे रत्न धारण करा
बुध ग्रह अनुकूल होण्यासाठी आणि करिअरमध्ये नवीन उंची गाठण्यासाठी बुध प्रदोषच्या दिवशी बुध ग्रहाचे रत्न पन्ना धारण करणे सर्वात शुभ आहे. असे मानले जाते की पन्ना धारण केल्याने नाव आणि कीर्ती मिळते आणि कुंडलीतून बुधाचे सर्व अशुभ प्रभाव दूर होतात.
बुध प्रदोष व्रताच्या दिवशी या वस्तूंचे दान करा
बुध प्रदोषाच्या शुभ मुहूर्तावर बुध ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि असे केल्याने शिवाच्या कृपेसोबत तुमच्या कुंडलीत बुध ग्रहही मजबूत होतो. बुध प्रदोषाच्या दिवशी हिरव्या भाज्या, मूग डाळ दान करा किंवा गायीला खाऊ घाला. असे केल्याने तुम्हाला आत्मसमाधानही मिळेल आणि शिवाचा आशीर्वादही प्राप्त होईल.
बुध प्रदोष व्रताला तुळशीचा उपाय
बुध प्रदोष तिथीला तुळशीची सेवा करणे देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की, असे केल्याने तुम्हाला भगवान शिवासोबत भगवान विष्णूचाही आशीर्वाद मिळतो. या दिवशी तुळशीला दूध आणि पाणी मिसळून अर्पण करा आणि तुळशीच्या मातीचा टिळा लावा, तसेच प्रसाद म्हणून तुळशीची पाने खडीसाखरे सोबत घ्या.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.