OnePlus Nord CE 3 Lite 5G (किंमत १९,९९९ रुपये)
या यादीतील पहिलाच फोन आहे OnePlus कंपनीचा
OnePlus Nord CE 3 Lite 5G. अलीकडेच लाँच झालेला हा फोन एक बेस्ट बजेट ५जी फोन आहे. कारण याची किंमत १९,९९९ असून फीचर्स फारच भारी आहेत. या OnePlus Nord CE 3 Lite 5G मध्ये 6.72-इंचाचा फुल एचडी प्लस LCD डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट आणि गोरिला ग्लास सपोर्टसह येतो. Snapdragon 695 5G प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत RAM सह फोनमध्ये UFS 2.2 स्टोरेज 256 GB पर्यंत उपलब्ध आहे. RAM 16 GB पर्यंत वाढवता देखील येऊ शकतो. फोनचा प्राथमिक कॅमेरा १०८ मेगापिक्सेल आणि सेकंडरी कॅमेरा २ मेगापिक्सेल आहे. फोनमधील तिसरा कॅमेराही २ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा आहे. त्याच वेळी, फोनमध्ये फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सेल देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
Xiaomi Redmi Note 11T 5G (किंमत १५,९९९ रुपये)
तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये फोन बघत असाल तर शाओमी कंपनीने एक खास कमी बजेटमधील ५जी फोनही लाँच केला आहे. Xiaomi Redmi Note 11T 5G असं या फोनच्या मॉडेलचं नाव असून याची किंमत १५,९९९ रुपये आहे. फीचर्सचं म्हणाल तर या फोनचा डिस्प्ले ६.६० इंचाचा आहे. तर रॅम ६जीबी असून ६४जीबीचा स्टोरेजही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे किंमतीच्या मानाने कॅमेराही तगडा आहे. ५० मेगापिक्सेल आणि ८ मेगापिक्सेलचे कॅमेरे बॅकसाईडला असून १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच बॅटरी बॅकअपही तगडी असून 5000mAh बॅटरी आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
POCO X4 Pro (किंमत १६,९९९ रुपये)
पोको कंपनीचा फोन X4 Pro हा देखील कमी बजेटमध्ये चांगला पर्याय आहे. १६,९९९ रुपये इतकी याची किंमत आहे. फीचर्सचा विचार केला तर, या फोनचा डिस्प्ले ६.६७ इंचाचा आहे. तर रॅम ८ जीबी असून १२८ जीबीचा स्टोरेजही देण्यात आला आहे. कॅमेरा फीचर्सचं म्हणाल तर ६४ मेगापिक्सेल, ८ मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेलचे कॅमेरे बॅकसाईडला असून १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच बॅटरी देखील 5000mAh इतकी आहे.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
Google Pixel 6a (किंमत ३१,९९९ रुपये)
तुम्ही जर गुगलचा फोन घेण्याचा विचार करत असाल तर Google Pixel 6a हा एक चांगला ऑप्श असू शकतो. ३१,९९९ रुपये किंमत असणारा हा फोन एक मिड रेंजमधील चांगला ५जी फोन आहे. याचे फीचर्स म्हणाल तर फोनचा डिस्प्ले ६.१० इंचाचा आहे. तर रॅम ६ जीबी असून १२८ जीबीचा स्टोरेजही आहे. दोन रेअर कॅमेरे १२.२ मेगापिक्सेल आणि १२ मेगापिक्सेल असे असून ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच बॅटरी 4410mAh इतकी आहे.
वाचाः Solar Storm : सूर्यावरील मोठ्या धमाक्यानंतर पृथ्वीवरही पोहोचलं वादळ, लदाखमध्ये दिसला परिणाम
Vivo Y56 5G (किंमत १९,९९९ रुपये)
विवो कंपनीचा Vivo Y56 5G हा देखील एक बजेट ५जी फोन आहे. १९,९९९ रुपये किंमत असणारा हा फोन लूकमध्येही भारी आहे. फीचर्सचा विचार केल्यास फोनचा डिस्प्ले ६.५८ इंचाचा आहे. तर रॅम ८ जीबी असून १२८ जीबीचा इनबिल्ट स्टोरेज आहे. दोन रेअर कॅमेरे ५० मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेल असे असून १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच बॅटरी 5000mAh इतकी आहे.
वाचाः iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी