Android युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, ‘हे’१९ॲप्स तुमच्यासाठी धोकादायक, लगेचच करा डिलीट

नवी दिल्ली : Virus Attack on Android Apps : तुम्हीही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुम्हाला सावधान व्हावं लागेल. कारण आम्ही सांगत असलेल्या यादीतील कोणतंही ॲप तुमच्या फोनमध्ये तुम्ही इन्स्टॉल केलं असल्यास तुमचा फोन, तुमची खाजगी माहिती असुरक्षित असू शकते. सायबर सुरक्षा कंपनी McAfee च्या रिपोर्टनुसार, काही ॲप्स चूकीच्या जाहिराती युजर्सना दाखवत असून त्यांच्या खाजगी डेटाशी छेडछाड करत असल्याचंही समोर आलं आहे.

सायबर सुरक्षा कंपनी McAfee ने जगभरातील ३५ दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांनी डाउनलोड केलेल्या १९ ॲप्सचा खुलासा करण्यात आला आहे. Minecraft सारखे गेमिंग अनुभव देणारे हे अधिकाधिक गेमिंग ॲप्स असून यांच्यामुळे अँड्रॉइड युजर्सला धोका निर्माण झाला आहे. McAfee ने ब्लॉक बॉक्स मास्टर डायमंड गेमचं चेकिंग केलं असताना यातून समोर आलं की, यातून वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर सतत विविध डोमेनवरून संशयास्पद जाहिराती येत होत्या. ब्लॉक बॉक्स मास्टर डायमंडप्रमाणे आणखी काही ॲप्सही असून या सर्वांची नाव पुढीलप्रमाणे…

सर्वाधिक डाऊनलोड केले गेलेले ॲप्स, त्वरीत करा डिलीट

Block Box Master Diamond
Craft Sword Mini Fun
Block Box Skyland Sword
Craft Monster Crazy Sword
Block Pro Forrest Diamond
Block Game Skyland Forrest
Block Rainbow Sword Dragon
Craft Rainbow Mini Builder
Block Forrest Tree Crazy
Craft Clever Monster Castle
Block Monster Diamond Dragon
Craft World Fun Robo
Block Pixelart Tree Pro
Craft Mini Lucky Fun
Block Earth Skyland World
Block Rainbow Monster Castle
Block Fun Rainbow Builder
Craft Dragon Diamond Robo
Block World Tree Monster

वाचा : Whatsapp घेऊन येत आहे तीन नवे फीचर्स, आता चॅटिंग होणार आणखी सेफ

Source link

android appsandroid phoneandroid usersmcafeevirusअॅन्ड्रॉईडमॅकॅफेव्हायरस ॲप्स
Comments (0)
Add Comment