चंद्रग्रहण २०२३
चंद्रग्रहणादरम्यान मंगळ आणि शुक्र दोन्ही मिथुन राशीत तर बुध मेष राशीत असेल. अशा स्थितीत मंगळ आणि बुध यांच्या दरम्यान असलेल्या या चंद्रग्रहणाच्या वेळी राशी परिवर्तन योगही राहील. अशा स्थितीत चंद्रग्रहणानंतर शेअर बाजारात उलथापालथीची स्थिती निर्माण होणार असल्याचे ज्योतिषीय गणना सांगते. महिलांवरील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. खेळाडूंसाठी चंद्रग्रहण शुभ राहील. चंद्रग्रहणानंतर आठवडाभरात देशातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ मे च्या रात्री लागणारे उपछाया चंद्रग्रहण कसे राहील. चंद्रग्रहणाची वेळ आणि चंद्रग्रहणाचा राशींवर होणारा प्रभाव जाणून घेऊया.
चंद्रग्रहणाची वेळ आणि कालावधी
वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता येणार आहे. भारतीय वेळेनुसार, चंद्रग्रहण रात्री ८ वाजून ४४ मिनिटांनी सुरू होईल आणि सुमारे १ वाजून २५ मिनिटांनी संपेल. चंद्रग्रहणाची मध्य वेळ रात्री १० वाजून ५३ मिनिटे असेल. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ४ तास १५ मिनिटे असेल.
या राशींवर चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव
वर्षातील पहिले चंद्रग्रहण मंगळ आणि बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाच्या दरम्यान होणार आहे. चंद्रग्रहणाच्या काळात चंद्र तूळ राशीत असेल, त्यामुळे चंद्रग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव तूळ आणि मेष राशीवर प्रतिकूल स्वरूपात दिसेल. याशिवाय वृश्चिक, वृषभ, कर्क आणि कन्या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण अशुभ राहील. चंद्रग्रहणापासून १५ दिवस या राशीच्या लोकांना खूप तणाव आणि त्रास सहन करावा लागेल.
या राशींवर चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव
मिथुन, सिंह, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी ५ मे रोजी होणारे चंद्रग्रहण एकंदरीत शुभ राहील. मिथुन राशीच्या लोकांना चंद्रग्रहणानंतर लाभाची संधी मिळेल. मीन राशीच्या लोकांना धनलाभ होईल, परंतु वडील आणि मुलांच्या आरोग्याबाबत तणाव असू शकतो.
कुठे दिसणार चंद्रग्रहण
भारताव्यतिरिक्त हे चंद्रग्रहण दक्षिण पूर्व युरोप, आशियातील बहुतांश भाग, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॅसिफिक, न्यूझीलंड, अटलांटिक, अंटार्क्टिका आणि हिंदी महासागर या ठिकाणी पाहता येईल.