आजकाल मोबाईल फोन म्हणजे अगदी गरजेटी वस्तू झाली आहे आणि या मोबाईलमध्ये गरजेची वस्तू म्हणजे रिचार्ज पॅक. आजकाल कॉलिंगसह इंटरनेट फारच महत्त्वाचं झालं असून विविध टेलिकॉम कंपन्या आपले युजर्स वाढवण्यासाठी एकापेक्षा एक दमदार मोबाईल रिचार्ज घेऊन येत असतात. सध्या मार्केटमध्ये रिलायन्स जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या कंपन्या आघाडीवर आहेत. दरम्यान या तिन्ही कंपन्यांचे ८४ दिवसांच्या वैधतेचे काही रिचार्ज सर्वाधिक फॉर्ममध्ये आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊ…
जिओचा ७१९ रुपयांचा प्लान
तर या फॉर्मेटमध्ये रिलायन्स जिओ ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा रिचार्ज ७१९ रुपयांना ऑफर करते. विशेष म्हणजे यामध्ये कंपनी दरदिवसाला २जीबी डेटा देक असून अनलिमिटेड ५जी डेटाही मिळणार आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत दिवसाला २जीबी डेटा हा अधिक आहे. याशिवाय दरदिवसाला १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग हे फायदेही युजर्सना मिळणार आहेत. तसंच जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही या अॅप्सचं अॅक्सेसही मिळणार आहे.
एअरटेलचा ७१९ रुपयांचा प्लान
एअरटेलचा ७१९ रुपयांचा प्लानही ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येत असून यामध्ये युजर्सना दरदिवसासाठी १.५जीबी डेटा मिळत असून अनलिमिटेड ५जी डेटाही मिळणार आहे. तसंच दरदिवसाचे १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग हे फायदेही युजर्सना मिळणार आहेत. याशिवाय एअरटेलच्या Xstream अॅपचं सब्सक्रिप्श आणि विंक म्यूझिकचं सब्सक्रिप्शनही यामध्ये युजर्सना मिळणार आहे.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
वोडाफोन-आयडियाचा ७१९ रुपयांचा प्लान
आतापर्यंत ५जी नेटवर्क जरी वोडाफोन आयडियाने आणलं नसल तरी त्यांचे रिचार्ज पॅक अगदी जिओ आणि एअरटेलला तोडीस तोड आहेत. त्यांचा हा ७१९ रुपयांचा प्लानंही जिओ, एअरटेलप्रमाणे ८४ दिवसांच्या वैधतेचाच आहे. यामध्ये देखील दरदिवसासाठी १.५जीबी डेटा मिळत असून Vi अॅपमधून रिचार्ज केल्यास एक्स्ट्रा ५जीबी डेटा मिळेल. तसंच बिंज ऑल नाईट, रात्री १२ ते सकाळी ६ अनलिमिटेड डेटा हे फायदे मिलणार आहेत. तसंच दरदिवसाचे १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग हे फायदेही युजर्सना मिळणार आहेत. याशिवाय Vi Movies आणि Vi Tv App चा फ्री अॅक्सेसही मिळणार आहे.
वाचाः iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी