Samsung Neo QLED 8K TV भारतात उद्या होणार लाँच, १५ हजाराची सूट मिळणार

नवी दिल्ली : Samsung Neo QLED 8K : सध्या 4K क्लिअरीटी म्हणजे अगदी भारी असं आपण म्हणतो किंवा समजतो. पण अशातच सॅमसंग कंपनी एक दमदार असा 8K क्लिअरीटी असणारा टीव्ही बाजारात आणत आहे. ४ मे रोजी भारतात हा टीव्ही लाँच होईल. Samsung Neo QLED 8K टीव्ही चीनसह इतर बाजारपेठांमध्ये सादर करण्यात आला असून या टीव्हीला जर्मन एव्ही मॅगझिनचा सर्वोत्कृष्ट टीव्हीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. आता सॅमसंगने नुकतीच भारतात Neo QLED 8K टीव्ही सादर करण्याची तारीख जाहीर केली आहे.कधी होणार लाँच?
Samsung India ने दिलेल्या माहितीनुसार Neo QLED 8K टीव्ही ४ मे रोजी दुपारी १२ वाजता सादर केला जाईल. कंपनीने टीव्हीसाठी प्री-ऑर्डरही सुरू केल्या आहेत, जेथे ग्राहक ५,००० रुपये भरून टीव्ही बुक करू शकतात. त्याच वेळी, फायनल चेकआऊंटवेळी ग्राहकांना १५,००० रुपयांपर्यंत सूट देखील मिळू शकते. हा नवीन स्मार्ट टीव्ही सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट तसेच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसह सॅमसंग रिटेल स्टोअर्सवरून बुक केला जाऊ शकतो.

Samsung Neo QLED 8K TV चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Neo QLED 8K TV मध्ये ६५ इंचाचा डिस्प्ले आहे. PANTONE द्वारे प्रमाणित केलेला हा जगातील पहिला डिस्प्ले आहे. हा टीव्ही क्वांटम मॅट्रिक्स टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो जो अल्ट्रा फास्ट कॉन्ट्रास्ट फीचरमुळे एका उत्कृष्ट टीव्हीचा अनुभव देतो. Neo QLED 8K TV च्या ऑडिओबद्दल बोलायचं झालं तर ऑडिओ-व्हिज्युअल ट्रॅकिंग OTS Pro तंत्रज्ञानाद्वारे सपोर्टेड आहे, जी ऑन-स्क्रीन सुरु असलेल्या चित्राप्रमाणे आवाजाचा प्रभाव अचूकपणे जुळवून घेते. याशिवाय, Neo QLED 8K टीव्ही सुपर-स्लिम बेझल्ससह स्लीक डिझाइनसह तयार केला आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर 4K 120Hz मोशन एन्हांसमेंट, डायनॅमिक एक्सेलेरेशन टेक्नोलॉजी आणि AMD FreeSync Premium Pro या टेक्नोलॉजीवर हा टीव्ही आधारीत आहे.

वाचाः iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी

Source link

65 inches tv8k tvsamsung neo qled 8k tvsmart tvसॅमसंग टीव्हीस्मार्ट टीव्ही८के टीव्ही
Comments (0)
Add Comment