Facebook वर तुम्हाला काय बघायचंय? हे आता तुम्ही ठरवणार, लवकरच येणार नवीन फीचर

नवी दिल्ली : Facebook New Features : सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी एक म्हणजे फेसबुक. युजर्सच्या वाढत्या गरजा आणि आवडी-निवडी पाहता फेसबुकवर देखील नवनवीन फीचर्स जोडण्यात येत आहेत. दरम्यान आता फेसबुकवर तुम्हाला काय बघायचंय? हे तुम्ही स्वत: ठरवु शकता. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एक पोस्ट शेअर करत याबाबती माहिती दिली आहे. कंपनी युजर्सना काही नवीन फीचर्स देणार आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स कंपनीला कोणत्याही कंटेंटसाठी फीडबॅक देऊ शकतील. नवीन अपडेटनंतर तुम्हाला फेसबुकवर हे नवीन फीचर मिळेल असंही मार्क यांच्या पोस्टमध्ये आहे.

काय आहे नवीन फीचर?
आजकाल आपण सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ रिल्स पाहण्यात घालवतो. आता यापुढे तुम्ही Facebook वर Reel पाहाल तेव्हा तुम्हाला दोन नवीन पर्याय मिळतील. रिलच्या शेवटी तुम्हाला तळाशी उजवीकडे दिसणार्‍या तीन डॉट्सच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि तिथे तुम्हाला ‘Show more’ किंवा ‘Show Less’ असे पर्याय दिसतील. जर तुम्ही एखादे रील पाहत असाल आणि तुम्हाला ते आवडत असेल आणि तुम्हाला असे आणखी कंटेंट पहायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला ‘Show more’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्याचप्रमाणे, जो कंटेंट तुम्हाला पाहायचा नाही, त्यासाठी तुम्हाला ‘Show Less’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. हे फीचर Facebook वर सामान्य पोस्टसाठी आधीच उपलब्ध होते, जे आता कंपनीने रिल्ससाठीही सुरु केले आहे.

Facebook Watch मध्येही बदल
मेटाने Facebook Watch मध्ये देखील काही युजर फ्रेंडली बदल केले आहेत. आता तुम्हाला फेसबुक वॉचमध्ये वरच्या बाजूला स्वतंत्रपणे Reels चा पर्याय दिसेल. तसेच, तुम्ही संगीत, व्हिडिओ आणि इतर गोष्टींमध्ये सहजपणे स्विच करू शकाल. मागील महिन्यात फेसबुकने युजर्सना अधिक मिनिटांच्या रील पोस्ट करण्याचा पर्याय दिला होता. यासोबतच रील्स क्रिएटिव्ह बनवण्यासाठी काही फीचर्स देखील जोडण्यात आले होते, आता रिल्सला थेट होमपेजवर घेत रिल्सला अधिक प्रमोट फेसबुक करत असल्याचं दिसून येत आहे.

वाचा : तुमच्या Android फोनमध्ये या ५ सेटिंग्स सुरु ठेवणं पडेल महाग, ऑन असतील तर आताच करा ऑफ

Source link

facebookfacebook featuresfacebook reelsmark zuckerbergmetaफेसबुकफेसबुक फीचर्समार्क झुकरबर्गमेटा
Comments (0)
Add Comment