Location History
Location History ही सेटिंग तुम्ही कुठे जात आहात आणि काय करत आहात यावर लक्ष ठेवते. तुमच्या लोकेशनची थेट माहिती गुगलला मिळते. त्यानुसार, ते तुम्हाला जाहिरात, हॉटेल, क्लब आणि शॉपिंग मॉल्सची माहिती दाखवतात. पण यामुळे तुमच्या खाजगी जीवनाचा थेट अॅक्सेस मिळतो. दरम्यान लोकेशन हिस्ट्री बंद करण्यासाठी अँड्रॉइड स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि त्यानंतर ‘डेटा आणि प्रायव्हसी’ विभागात जाऊन त्यामधील गुगल अकाउंट आणि मॅनेज अकाउंट ऑप्शनमध्ये जा. इथे लोकेशन हिस्ट्री चालू असेल तर लगेच बंद करा. गरज असल्यास तेवढ्यापुरतीच तुम्ही ही सेटिंग वापरु शकतो.
वाचाः iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी
Near by Device
जर तुम्ही Near by Device ही सेटिंग चालू केली असेल तर ती देखील त्वरीत बंद करा, कारण ही सेटिंग सुरु असल्यामुळे तुमच्या आजूबाजूला असणारे कोणीही अनोळखी व्यक्ती असं कोणीही तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट होऊ शकते आणि ते फोनला हॅक देखील होऊ शकते. त्यामुळे अधिकता शेअरिंगसाठी वापरली जाणारी ही सेटिंग इतरवेळी बंदच ठेवावी.
वाचाः Solar Storm : सूर्यावरील मोठ्या धमाक्यानंतर पृथ्वीवरही पोहोचलं वादळ, लदाखमध्ये दिसला परिणाम
Lock Screen Notification
आपल्याला आजकाल कितीतरी मेसेज आणि वेगवेगळ्या गोष्टींचे नोटिफिकेशन्स येत असतात. पण आपण नोटिफिकेशन्स बारमधून हवा तो मेसेज किंवा ईमेल जे काही असेल ते ओपन करतो. पण अनेकदा स्क्रीन लॉक असतानाही आपण नोटिफिकेशन ऑन ठेवल्यास कोणीही आसपासचा व्यक्ती तुमचे मेसेज किंवा ईमेल इतर काहीही वाचू शकतो. जर असं होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर
Lock Screen Notification ही सेटिंग ऑफ ठेवावी.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
Data Saving
डेटा सेव्हिंग हे फीचर चालू केल्यावर, मोबाइल फोनची बॅटरी लवकर संपते कारण ते अॅप्सना बॅकग्राउंडमध्ये इंटरनेट वापरण्याची परवानगी देत नाही. आपण परवानगी दिली तरच हा मोड ऑन होतो. तसंच आपण ते आवश्यक तेव्हा ही सेटिंग गरजेप्रमाणे चालू करु शकतो. पण उर्वरित वेळेत ते बंद करणंच योग्य आहे.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
Personalized Ads
Google अकाउंटच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाा ही सेटिंग देखील त्वरीत बंद करावी लागणार आहे. कारण याच्या मदतीने Google तुमच्या फोनला ट्रॅक करु शकतात. त्यामुळे तुम्हाला काय आवडते आणि काय नाही अशा सर्व गुगलला कळतात. तुम्हाला हा पर्याय Google खात्याच्या अंतर्गत ‘डेटा आणि गोपनीयता’ विभागामध्ये दिसेल.
वाचा : 5G Smartphones : मार्केटमध्ये या ‘टॉप ५’ 5G स्मार्टफोन्सची जोरदार चर्चा, किंमत आणि फीचर्स पाहा