Samsung M53 5G स्मार्टफोनवर १० हजारांपर्यंतची सूट, तब्बल 108Mp चा आहे कॅमेरा

नवी दिल्ली :Samsung Galaxy M53 Features : तुम्हाला जर सॅमसंगचे फोनच आवडत असतील आणि एक नवाकोरा ५जी फोन घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सॅमसंगचा दमदार फीचर्स असणारा लेटेस्ट ५जी स्मार्टफोन Samsung Galaxy M53 दमदार डिस्काउंटसह सध्या उपलब्ध आहे. तब्बल १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असणारा हा फोन आता खरेदी केल्यास तुम्ही जवळपास १०,००० रुपये वाचवू शकता. तर हा फोन फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर दमदार डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तर नेमकी काय ऑफर आहे आणि या Samsung Galaxy M53 चे फीचर्स पाहूया…

तर फ्लिपकार्टवर हा फोन सध्या ३० टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. त्यामुळे या फोनची मूळक किमत ३४,९९९ रुपये असून ३० टक्के डिस्काउंटनंतर हा फोन आता २४,३४७ रुपयांना विकत घेता येऊ शकतो. त्यामुळे या डिस्काउंटसह जवळपास १०,००० रुपये वाचवण्याची संधी सध्या आहे. तसंच SBI बँकचं क्रेडिट कार्ड असल्यास आणखी ७५० रुपयांची सूट मिळू शकते. ज्यानंतर फोन २३,५९७ रुपयांना मिळू शकतो.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Samsung Galaxy M53 चे स्पेसिफिकेशन्स

आता या Samsung Galaxy M53 चे स्पेसिफिकेशन्स म्हणाल तर यामध्ये ६.७ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असून प्रोसेसरचं म्हणाल तर MediaTek Dimensity 900 चिपसेट देण्यात आला आहे. यानंतर फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे फोनचा रेअर कॅमेरा. फोनला १०८ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड कॅमेरा तसंच २ मेगापिक्सेलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा असे चार कॅमेरे आहे. तर फ्रंट कॅमेराही दमदार आहे. याशिवाय 5000mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.

वाचाः iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी

Source link

samsung galaxy m53samsung galaxy m53 offersamsung galaxy m53 specssmartphonesmartphone offerसॅमसंग एम५३ मॉडेलसॅमसंग ऑफर
Comments (0)
Add Comment