Nothing Phone (2) स्मार्टफोन येतोय, कंपनीकडून घोषणा, सॅमसंग आणि शाओमीचं टेन्शन वाढलं

नवी दिल्लीः Nothing Phone (2) Launch: Nothing Phone (2) च्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली आहे. Nothing Phone (2) स्मार्टफोन हा आधीच्या Nothing Phont (1) फोनपेक्षा पॉवरफुल असणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, Nothing Phone (2) स्मार्टफोन मध्ये लेटेस्ट Snapdragon 8 सीरीजचा चिपसेटचा वापर करण्यात येणार आहे. कंपनी कोणत्या तारखेला या फोनला लाँच करणार आहे, यासंबंधी कंपनीने अजून पर्यंत जाहीर केले नाही. परंतु, कंपनीने हे सांगितले आहे की, या वर्षीच्या जून पर्यंत या फोनला लाँच केले जाऊ शकते. फोनच्या लाँचिंगच्या तारखेची घोषणा पुढील काही दिवसात केली जाऊ शकते.

किंमत आणि फीचर्स

याआधी लाँच करण्यात आलेल्या Nothing Phone (1) स्मार्टफोनच्या डिझाइन वरून खूप चर्चा झाली होती. तसेच ग्राहकांचा या फोनला जबरदस्त प्रतिसाद सुद्धा मिळाला होता. यावेळी सुद्धा कंपनी काही तरी नवीन करण्याची तयारी करीत आहे. Nothing Phone (2) मध्ये आधीच्या प्रमाणे ट्रान्सपॅरेंट डिझाइन दिली जाणार आहे. कारण, यात तुम्हाला लेटेस्ट जनरेशनचे Qualcomm 9 Gen सीरीजची चिपसेट पाहायला मिळू शकते. परंतु, लीक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, Nothing Phone (2) फोनची किंमत आधीच्या फोनच्या तुलनेत जास्त असणार आहे. Nothing Phone (1) ला कंपनीने मिड बजेट रेंज मध्ये लाँच केले होते. परंतु, Nothing Phone (2) ला प्रीमियम सेगमेंट मध्ये लाँच केले जाऊ शकते. Nothing Phone (1) ला फ्लिपकार्टवरून बँक डिस्काउंट ऑफर मध्ये २५ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता येते.

वाचाः WhatsApp News : सावधान! तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट कायमचं होईल बॅन, आजच ‘या’ 8 गोष्टी करणं थांबवा!

Nothing Phone (1) स्पेसिफिकेशन्स
Nothing Phone (1) मध्ये 6.5 इंचाची फ्लेक्सिबल OLED डिस्पले मिळते. जी 60Hz ते120Hz एडेप्टिव रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट सोबत येते. फोनच्या फ्रंट आणि बॅक पॅनलमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन दिले आहे. फोनला 33W फास्ट चार्जिंग आणि 4500mAh ची बॅटरी सपोर्ट सोबत आणले आहे. या फोनच्या रियर पॅनेलवर ५० मेगापिक्सलचा सॅमसंग JN1 सेन्सर आणि 50 MP Sony IMX766 सेंसर दिला आहे.

वाचाः Samsung M53 5G स्मार्टफोनवर १० हजारांपर्यंतची सूट, तब्बल 108Mp चा आहे कॅमेरा

Source link

nothing phone (1)nothing phone (1) featuresnothing phone 1 specificationsNothing Phone 2nothing phone 2 launch
Comments (0)
Add Comment