नवी दिल्ली : Five Asteroid towards earth : मागील काही दिवसांपासून एकामागून एक लघुग्रह पृथ्वीजवळुन जात आहेत. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात नासा (NASA) याबाबत दरवेळी माहिती म्हणजेच एकप्रकारे चेतावणी देत असते. दरम्यान हे लघुग्रह सतत अवकाशात फिरत असतात आणि विविध ग्रहांच्या जवळून जातात. पण जेव्हा यापैकी एखादा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जातो तेव्हा त्याच्यासाठी अलर्ट जारी केला जातो. नासाने आता पृथ्वीवरून एक किंवा दोन नव्हे तर तब्बल पाच लघुग्रह जाणार असल्याचा इशारा दिला आहे. यापैकी एक लघुग्रह आपल्या पृथ्वीच्या अगदी चंद्र जितक्या जवळ आहे, तितक्या जवळून जाणार आहे. या पाच मोठ्या लघुग्रहांमुळे पृथ्वीवासियांची चिंता वाढली आहे.NASA ने पृथ्वीच्या जवळून जाणार्या अनेक लघुग्रहांबद्दल याआधीही बऱ्याचदा अलर्ट जारी केला आहे. पण यावेळी तब्बल पाच लघुग्रहांबद्दल नासाने माहिती दिली आहे. दरम्यान नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL) नुसार, यातील एक लघुग्रह 2023 HV5 बुधवारी (३ मे) पृथ्वीच्या जवळ येणार होता. पण तो आकाराने अधिक मोठा नसून ४१ फूटांचाच होता. त्यानंतर आज लघुग्रह 2023 HF7 हा पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्याचा आकार ५१ फूट असल्याचे सांगितले जात आहे. पृथ्वीपासून ६३९,००० किलोमीटर इतकं त्याचं अंतर असेल. आज Asteroid 2023 HH7 देखील पृथ्वीवरून जाणार आहे. त्याचा आकार ८९ फूट असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचं पृथ्वीपासून अंतर ८३९,००० किमी असेल. आजच 2023 HZ4 हा लघुग्रह देखील पृथ्वीजवळून जाणार असून त्यांचा आकार तब्बल 180 फूट आहे त्याचं पृथ्वीपासून अंतर ३,०८०,००० किमी असेल.
उद्याही आहे पृथ्वीजवळ लघुग्रह
ज्यानंतर उद्या म्हजेच ५ मे रोजी आणखी एक लघुग्रह पृथ्वीवरून जाणार आहे. या तीन दिवसांत पृथ्वीच्या जवळ येणारा हा पाचवा लघुग्रह असेल. ज्याचं नाव 2006 HX57 असे सांगण्यात आले आहे. हा ९४ फूट मोठा लघुग्रह आहे जो ५ मे रोजी पृथ्वीच्या जवळ येणार असून त्याचं पृथ्वीपासूनचं अंतर २,६००,००० किमी असेल. नासाकडून यापैकी कोणत्याही लघुग्रह पृथ्वीवर आदळणार अशी माहिती आली नसली तरी त्यांनी सतर्कतेचा इशारा नक्कीच दिला आह.
वाचाः Solar Storm : सूर्यावरील मोठ्या धमाक्यानंतर पृथ्वीवरही पोहोचलं वादळ, लदाखमध्ये दिसला परिणाम