‘शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांवर संस्काराची गरज’

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

‘अनेक शाळांमध्ये भरमसाठ फी घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. मात्र, इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. शिक्षणामुळेच माणूस मोठा होतो. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याची गरज आहे,’ असे गोळेगावचे उपसरपंच संतोष जोशी यांनी सांगितले.

काटशिवरी फाटा येथील इरा इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या निमित्त उपसरपंच संतोष जोशी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संस्थेतील विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर विजय चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित ‘ग्रॅज्युएशन डे’निमित्त गोळेगावचे उपसरपंच संतोष जोशी यांनी पालकांना मार्गदर्शन केले. त्या प्रसंगी जोशी म्हणाले, ‘ज्याप्रमाणे आपण शेतीला काटेरी कुंपण करतो, त्याचप्रमाणे संस्कार रुपी कुंपणांची बालमनाला व बालकांना अत्यंत आवश्यकता आहे. याबाबत उपस्थित सर्व तालुक्यातील शेतकरी पालकांना त्यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारून अंतकरणातून शेतकऱ्यांना आपल्या मुलांना घडविण्यासाठी संस्काररूपी बीज पेरून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रयत्न करा.’ या प्रसंगी इरा इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ॲड. अविनाश औटे व विजय चौधरी यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी आणि पालक उपस्थित होते. इरा इंटरनॅशनल स्कूल येथे शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाते, याबाबत त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इरा इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका; तसेच कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये उपसरपंच संतोष जोशी यांचे हस्ते विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.

Source link

Career NewsEducationeducation newsKhulatabadMaharashtra TimesSecrament on studentsशिक्षणासोबत संस्कार
Comments (0)
Add Comment