आधार कार्डवरचं नाव/पत्ता बदलायचा आहे? घरबसल्या करु शकता, फक्त या १० स्टेप्स कराव्या लागतील फॉलो

नवी दिल्ली : Aadhar Card Update Online : तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक माहितीत जर बदल करायचा असल्यास आता कुठेही फिरण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या हे करु शकता. आता मागील काही वर्षात आधार कार्ड फारच महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक भारतीयाची विशिष्ट ओळख म्हणून हे आधार कार्ड ओळखलं जातं. त्यामुळे यात कोणतीही छोटी चूकही तुमचं नुकसान करु शकते, त्यामुळे यात कोणताही योग्य बदल करायचा असल्यास तुम्ही UIDAI च्या म्हणजे आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन करू शकता. तर आधार कार्डवर पत्ता, फोन नंबर, नाव आणि जन्मतारीख अशा गोष्टी ऑनलाइन कशा बदलू शकता ते जाणून घेऊ..

स्टेप १ : UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://uidai.gov.in/ आणि “माय आधार” टॅबमधील “अपडेट आधार” पर्यायावर क्लिक करा.

स्टेप २ : “अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन” या पर्यायवर क्लिक करा. त्यानंतर “अपडेट आधार” विभागाच्या आतील या “अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन” या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप ३ : त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा सुरक्षा कोड टाका. मग “ओटीपी पाठवा” बटणावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) मिळेल.

स्टेप ४: दिलेल्या जागेत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि “लॉगिन” बटणावर क्लिक करा.

स्टेप ५: त्यानंतर तुम्ही करू इच्छित बदलांना समर्थन देणाऱ्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. म्हणजेच तुम्हाला जी देखील गोष्ट किंवा मजकूर बदलायचा आहे तो योग्य आहे हे दाखवणारे इतर डॉक्यूमेंट्स अपलोड करा. तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट करायचा असेल तर तुमचा पत्ता पुरावा जसे की लाईट बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासपोर्ट अपलोड करा.

स्टेप ६ : तुम्ही केलेले बदल पुन्हा तपासा आणि माहितीची पडताळणी करा. आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

स्टेप ७ : त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या लिस्टमधून BPO Service ऑप्शन निवडा. BPO Service प्रोव्हाईडर्सला UIDAI द्वारे आधार अपडेटसंबधित रिक्वेस्ट हाताळण्यासाठी अधिकृत केले गेले आहे. ते तुमची माहिती वेरिफाय करती.

स्टेप ८: तुमच्या अपडेट विनंतीची पुष्टी करा आणि “सबमिट” बटणावर क्लिक करा.

स्टेप ९: विनंती सबमिट केल्यानंतर, तुम्हाला युनिक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) सह पुष्टीकरण मिळेल. तुम्हाला हा URN सांभाळून ठेवावा लागेल कारण याद्वारेच तुम्ही तुमची रिक्वेस्ट ट्रॅक करु शकता.

स्टेप १० : वरील सर्व स्टेप्स झाल्यानंतर ठरावीक काळानंतर तुमची माहिती अपडेट होईल तोवर तुम्ही UIDAI वेबसाइटवर किंवा UIDAI मोबाइल अॅपद्वारे URN वापरून तुमच्या अपडेट विनंतीची स्थिती ट्रॅक करू शकता.

वाचा : मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक

Source link

aadhar cardaadhar card updateaadhar updateuidaiआधार कार्डआधार कार्ड अपडेट
Comments (0)
Add Comment