या कपातीद्वारे, कंपनी तिच्या एकूण कर्मचार्यांपैकी १५ टक्के कपात करेल. जगातील आघाडीच्या स्टार्टअप गुंतवणूकदार सॉफ्ट बँकने मीशोमध्ये गुंतवणूक केली आहे. मीशो या वर्षी कपातीची ही दुसरी फेरी करत आहे.
बंगळुरूस्थित मीशोने यापूर्वी आपल्या ग्रॉसरी व्यवसायातून २५० कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. कंपनीने आता फार्मिसो नावाचा नवीन ब्रँड म्हणून किराणा व्यवसायाची सुपर स्टोरी लॉन्च केली आहे.
कपातीवर कंपनीने काय सांगितले?
नवीन फेरीच्या कपातीसंदर्भात कंपनीचे सीईओ विदित अत्रे यांनी ई-मेलद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. मीशोमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त भरती करण्याचा निर्णय चुकीचा होता. जास्त खर्चामुळे अनेक प्रतिकूल परिस्थितींना तोंड द्यावे लागले. यामुळे आपण कटू सत्याला सामोरे जात आहोत. आणि आम्हाला लोकांना काढून टाकावे लागेल. इथून पुढे आणखी चांगली कामगिरी करण्याची आम्हाला आशा असल्याचे ते म्हणाले.
कर्मचाऱ्यांना अडीच ते नऊ महिन्यांचे पगार देणार
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळ आणि पदानुसार अडीच महिन्यांपासून ते ९ महिन्यांपर्यंतचे वेतन दिले जाईल. याशिवाय, ईएसओपी पात्र लोकांना प्री-रिलीझ इन्शुरन्स बेनिफिट्स आणि नोकऱ्या बदलण्यामध्ये सहकार्य केले जाणार आहे.
कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नोटीस कालावधीसह एक महिन्याचा अतिरिक्त पगार दिला जाणार आहे. कर्मचारी सेवेच्या कालावधीनुसार प्रत्येक वर्षाच्या आधारावर १५ दिवसांचे पैसे देखील दिले जाणार आहेत.