नवी दिल्ली : Gmail Blue Verification : आजकाल नवनवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मार्केटमध्ये येत असून यावर लाखो लोक आपली खाती तयार करत आहेत. अशामध्ये ट्विटर कंपनीने बऱ्याच काळापूर्वी वेरिफायड अकाउंट ही संकल्पना आणली होती, ज्यामध्ये वेरिफायड अकाउंटच्या नावापुढे एक विशिष्ट अशी बरोबर चिन्हाची खूण दिली जाते. दरम्यान ट्विटरने वेरिफाय अकाउंट्सना ब्लू टिक द्यायला सर्वात आधी सुरुवात केली त्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम अशा प्लॅटफॉर्मवर देखील ही वेरिफिकेशनची टिक मिळू लागल्यावर आता जीमेलवरही ब्लू टिक मिळणार आहे.ट्विटरप्रमाणे जीमेलही आता ब्लू टिक्स देण्यास सुरुवात करत आहे. सध्या ही ब्लू टिक निवडक अकाउंट्सनाच मिळणार आहे. तर गुगल कंपनी ब्लू टिकसाठी ट्विटरप्रमाणे काही शुल्क आकारणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर नेमकं या टिकमुळे कोणाला आणि काय फायदे होतील ते पाहूया…
कोणाला होईल फायदा?
जीमेलचे सध्याचे ब्रँड इंडिकेटर फॉर मेसेज आयडेंटिफिकेशन (BIMI) फीचर स्वीकारलेल्या कंपन्यांच्या नावांपुढे Gmail च्या ब्लू टिक्स आपोआप दिसतील. पहिल्या टप्प्यात सेलिब्रिटी, मीडिया आणि इतर कंपन्यांशी संबंधित युजर्सना हा लाभ दिला जाईल. ब्लू टिकसाठी, वापरकर्त्यांना त्यांचे खाते वेरिफाय करावे लागेल. त्याची प्रक्रिया फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर प्रमाणेच असेल. फेक अकाऊंट्सची संख्या कमी करण्यासाठी जीमेलनं हे काम सुरु केलं आहे. लादले जाऊ शकते.
कायफायदा होऊ शकतात?
टेक कंपन्यांनी पेड सर्व्हिसमध्ये यूजर्सना खास फीचर्स द्यायला सुरुवात केली आहे. ट्विटरने ब्लू टिक वापरकर्त्यांना मोठे व्हिडिओ पोस्ट करण्याची परवानगी दिली आहे. जीमेल देखील आपल्या वापरकर्त्यांना असे फायदे देऊ शकते. याशिवाय जीमेलवर स्टोरेजसाठी उपलब्ध जागाही वाढवता येऊ शकते.

वाचाः आधार कार्डवरचं नाव/पत्ता बदलायचा आहे? घरबसल्या करु शकता, फक्त या १० स्टेप्स कराव्या लागतील फॉलो
BIMI वैशिष्ट्य काय आहे?
हे वैशिष्ट्य 2021 मध्ये लाँच करण्यात आले होते. या वैशिष्ट्यानंतर, जर एखाद्या वापरकर्त्याने त्याच्या ब्रँडचा लोगो दर्शविला तर त्याला पाठवणाऱ्याची पडताळणी करावी लागेल आणि त्याच्या ब्रँडचा लोगो देखील सत्यापित करावा लागेल. तुम्हाला कोणत्याही ब्रँडच्या नावापुढे निळा चेकमार्क दिसल्यास, याचा अर्थ असा होतो की त्याने BIMI वैशिष्ट्य स्वीकारले आहे.
वाचा : Flipkart-Amazon च्या सेलमध्ये ८००० पेक्षा कमी किंमतीतही स्मार्टफोन्स उपलब्ध, पाहा टॉप ४