तर आता सर्वात आधी तुम्ही विचार कराल की व्हॉट्सॲपला कसं माहित नेमकं तुमचं बेस्ट फ्रेंड कोण आहे? पण व्हॉट्सॲप हे ठरवतं ते म्हणजे तुम्ही कोणाशी आणि किती चॅटिंग केली आहे, याप्रमाणावर. तर आता याआधारे व्हॉट्सॲपने काढलेली तुमच्या बेस्ट फ्रेंड्सशी लिस्ट कशी पाहाल जाणून घेऊ…
व्हॉट्सॲपवरील बेस्ट फ्रेंड्सची लिस्ट कशी पाहाल?
- सगळ्यात आधी व्हॉट्सॲप ओपन करा, त्यानंतर वरच्या साईटला कोपऱ्यास असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. ज्यानंतर त्यामध्ये सेटिंग्स या ऑप्शनमध्ये जा.
- त्यानंतर सेटिंग्समध्ये तुम्हाला Data and Storage Usage हा ऑप्शन दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल.
- आता यावर क्लिक करताच तुम्हाला वरुन खालीपर्यंत क्रमवार अशाप्रकारे कॉन्टॅक्ट्सची लिस्ट दिसेल, ज्याच्यांशी तुम्ही सर्वाधिक चॅटिंग केली आहे.
- या लिस्टनुसार तुम्ही पाहू शकता, कोण आहे तुमचं व्हॉट्सॲपवरचा बेस्ट फ्रेंड
व्हॉट्सॲप घेऊन येत आहे नवीन लॉक्ड फीचर
व्हॉट्सॲप मागील काही दिवसांपासून आपल्या युजर्ससाठी एकापेक्षा एक फीचर घेऊन येत आहे. आताही त्यांनी एक भारी असं लॉक्ड फीचर आणणार असल्याचं सांगितलं आहे. तर समजा जर तुम्ही एखाद्याशी चॅट करत असताना त्या कॉन्टॅक्टसोबतची चॅट खाजगी ठेवू इच्छित आहात, म्हणजेच दुसऱ्या कॉन्टॅक्ट्सपासून लांब ठेवू इच्छित असाल तर हे लॉक्ड चॅट फीचर तुमच्यासाठी भारी आहे. आता तुम्ही हवं असेल तर संपूर्ण व्हॉट्सॲप या ॲपला लॉक करु शकता. पण तुम्हाला हवं ते स्पेसफिक चॅट लॉक करण्याचं फीचर लवकरच व्हॉट्सॲप घेऊन येत आहे.
वाचा : घरी आणा आधुनिक फीचर्ससह दमदार असा QLED TV, Amazon च्या सेलमध्ये मिळतेय तगडी सूट