नवी दिल्ली : BSNL Mobile Recharge Plan : एकीकडे जिओ, एअरटेलनं ५जी नेटवर्क आणलं आहे. वोडाफोन-आयडिया देखील धमाल अशा ऑफर्स घेऊन येत आहे. अशामध्ये सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल देखील आपले ग्राहक टिकवण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक प्लान्स घेऊन येत आहे. अशातच त्यांनी अधिक डेटाची गरज असणाऱ्यांसाठी काही खा स रिचार्ज प्लान आणले आहेत. या दोन प्लान्सची किंमत अनुक्रमे २९९ आणि ५९९ अशी आहे. चला तर जाणून घेऊन या BSNL च्या दोन खास रिचार्ज प्लान्सबद्दल…वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!
BSNL चा २९९ रुपयांचा प्लान
बीएसएनएलचा २९९ रुपयांचा प्लान ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग कंपनी ऑफर करते. तसंच यामध्ये दर दिवसासाठी तब्बल ३जीबी डेटा देखील मिळतो. याशिवाय १०० एसएमएस दिवसाला मिळत असून दिलेला डेटा संपल्यानंतर नेटची स्पीड कमी होऊन 40kbps होते.
BSNL चा २९९ रुपयांचा प्लान
बीएसएनएलचा २९९ रुपयांचा प्लान ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग कंपनी ऑफर करते. तसंच यामध्ये दर दिवसासाठी तब्बल ३जीबी डेटा देखील मिळतो. याशिवाय १०० एसएमएस दिवसाला मिळत असून दिलेला डेटा संपल्यानंतर नेटची स्पीड कमी होऊन 40kbps होते.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
BSNL चा ५९९ रुपयांचा प्लान
बीएसएनएलचा हा ५९९ रुपयांचा प्लान अधिक फायद्यांसह आणि अधिक वैधतेसह येतो. हा ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येत असून यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग कंपनी ऑफर करते. तसंच यामध्ये दर दिवसासाठी तब्बल ३जीबी डेटा देखील मिळतो. याशिवाय १०० एसएमएस दिवसाला मिळतात. याशिवाय यामध्ये अधिकचे फायदे म्हणाल तर Zing+PRBT+AstroCell चं अॅक्सेस असून रात्री १२ ते सकाळी ५ पर्यंत अनलिमिटेड फ्री नाईट डेटाही आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन