पिंपरी-चिंचवड शहरात मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी ‘आरटीई’ अंतर्गत १२१८ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यांच्या प्रवेश अर्जांची पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी आठ मेपर्यंत सुरू राहणार आहे. अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (आरटीई) शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया २३ जानेवारीला सुरू झाली. सध्या आकुर्डी आणि पिंपरी विभाग मिळून १२१८ विद्यार्थी पात्र झाले असून, एकूण ३,२८१ जागा आहेत. पिंपरी केंद्रातून ३३ प्रवेश नाकारण्यात आले. आकुर्डी केंद्रातून १३९८ आणि पिंपरी केंद्रातून ६१५ जागा शिल्लक आहेत. अर्ज भरल्यानंतर छाननीला १३ एप्रिल ते ८ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली. ‘आरटीई’ प्रवेशासाठी १२ एप्रिलपासून पालकांना मेसेज गेले.
संपर्क साधण्याचे आवाहन
‘आरटीई अर्जां’संबंधी कोणतीही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी केले आहे. त्यामुळे पालकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, असा शिक्षण विभागाचा हेतू आहे.
आकुर्डी केंद्र
एकूण जागा
२,१८५
…
झालेले प्रवेश
७७०
…
पिंपरी केंद्र
एकूण जागा
१०९६
…
झालेले प्रवेश
४४८