अनेकजण फोनच्या खराब बॅटरीमुळे त्रस्त
Oppo आणि Counterpoint च्या या सर्वेक्षणाला १,५००० लोकांनी प्रतिसाद दिला. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्के लोकांनी मान्य केले की ते खराब बॅटरीमुळे स्मार्टफोन बदलण्यासाठी तयार आहेत. या सर्वेक्षणाबाबत ओप्पो इंडियाचे एक वरिष्ठ अधिकारी दमयंत सिंग खानोरिया म्हणाले की, या सर्वेक्षणामुळे आम्हाला अधिक चांगली बॅटरी लाइफ असलेले फोन लॉन्च करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
महिलांपेक्षा पुरुषांना मोबाईलची जास्त काळजी असते
या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, महिलांच्या तुलनेत पुरुषांना मोबाईलची जास्त काळजी वाटते. सर्वेक्षणात सामील असलेल्या ८२ टक्के पुरुषांनी कबूल केले की त्यांना फोनबाबत जास्त टेन्शन आहे, तर ७४ टक्के महिलांनी सांगितले की त्यांना फोनची बॅटरी आणि इंटरनेटची काळजी वाटते. सर्वेक्षणात सहभागी एकूण ९२.५ टक्के लोकांनी सांगितले की ते पॉवर सेव्हिंग मोड वापरतात.
४२ टक्के वापरकर्ते मनोरंजनासाठी फोन वापरतात
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४२ टक्के लोकांनी हे मान्य केले की ते मनोरंजनासाठी त्यांचा फोन वापरतात आणि मनोरंजनाचं त्याचं मुख्य साधण म्हणजे सोशल मीडिया हे आहे. सुमारे ६५ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना बॅटरी वाचवण्यासाठी अनेक वेळा फोन वापरणे टाळावे देखील लागते. तर एकंदरीत काय या सर्वेक्षणातून हे समोर आले की, फोन हा अनेकांसाठी फारच महत्त्वाचा झाला आहे.
वाचाः मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक