संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका
तर खातं सुरक्षित ठेवतान घ्यायच्या काळजीमधील सर्वात पहिली टिप म्हणजे फेसबुक युजर्सनी त्यांना मिळालेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. विशेषत: जर तुम्हाला माहीत नसलेल्या लोकांद्वारे ही लिंक आली असेल किंवा एखाद्या अनोळखी ग्रुपमध्ये रँडमली कोणी टाकली असेल तर अजिबात लिंक ओपन करु नाका. अशावेळी त्या लिंकवर क्लिक करण्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं. कारण लिंकवर क्लिक करताच तुम्ही तुमच्या खात्याच्या सुरक्षिततेशी तडजोड करू करता आणि नको त्या व्यक्तीकडे खात्याचे खाजगी तपशील जातात.
वाचाः दमदार बॅटरी आणि 144Hz रिफ्रेश रेट सोबत Motorola Edge 40 फोन लाँच
अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका
ज्याप्रकारे अनोळखी लिंक ओपन करायच्या नाहीत, तसंच
तुम्ही ओळखत नसलेल्या लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट देखील स्वीकारू नका अशी शिफारस फेसबुककडून केली जाते. अनेकदा अनोळखी लोकांना रिक्वेस्ट पाठवू नका अशी सूचनाही फेसबुक देते. कारण अनोळखी आलेल्या रिक्वेस्ट अनेकदा लोक बनावट खातं करुन पाठवू शकतात, ज्याने स्क२म होऊ शकतो. तुमचं खात हॅक होऊ शकतं.
वाचाः २०२३ मधील टॉप फीचर्सचे स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन अॅक्टिव्ह करा
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) हा फेसबुकवर असणारा ऑप्शन अॅक्टिव्ह करणं खात्याच्या सुरक्षेसाठी फार गरजेचं आहे. हे सुरु करण्यासाठी फेसबुकच्या सेटिंगमधील सिक्योरिटी ऑप्शनमध्ये तुम्हाला जावं लागेल. हे करत असताना तुम्हाला तुमचा अधिकृत ईमेल आयडि आणि फोन नंबर वेरिफाय करावा लागेल तर या टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनमुळे तुम्ही Facebook ओळखत नसलेल्या डिव्हाइसवरून लॉग इन करताना तुम्हाला तुमच्या ओळखीचं वेरिफिकेशन करावं लागेल. ज्यामुळे तुमच्याशिवाय कोणी लॉग इन करतानाही तुम्हाला कळवले जाईल.
वाचाः Samsung M53 5G स्मार्टफोनवर १० हजारांपर्यंतची सूट, तब्बल 108Mp चा आहे कॅमेरा
मजबूत आणि युनिक पासवर्ड वापरा
पासवर्ड हे हॅकर्सच्या विरूद्ध तुमच्या सुरक्षिततेचे पहिले पाऊल आहे. त्यामुळे तुम्ही एक मजबूत आणि युनिक असा पासवर्ड निवडणे महत्वाचं आहे ज्याचा अंदाज लावणं कोणालाही सोपं नसेल. पण तुम्हाला तो लक्षात राहणंही महत्त्वाच आहे. तुमची जन्मतारीख, नाव, कार नंबर इत्यादींचा पासवर्ड म्हणून कधीही वापर करू नका. तसेच तुमच्या Facebook खात्याचा पासवर्ड इतर ठिकाणी पुन्हा वापरू नका किंवा इतरांशी शेअर करू नका.
वाचा : Amazon Great Summer Sale ला सुरुवात, Apple, Oneplus सह या ८ फोन्सवर बंपर डिस्काउंट
कोणत्याही अनोळखी डिव्हाईसवरुन लॉग इन करु नका
तुमचं फेसबुक हे केवळ तुमच्या डिव्हाईसमध्ये म्हणजे फोन किंवा पर्सनल लॅपटॉप यात लॉग इन करणं फार फायद्याचं आहे. विविध ठिकाणी हे अकाउंच लॉग इन केल्याने तुमच्या अकाउंटची सुरक्षितता घोक्यात येते. त्यामुळे तुमच्या पर्सनल डिव्हाईसेसशिवाय कुठनही लॉग इन करताना काळजी घ्या. विशेषत: दुसऱ्याच्या डिव्हाइसमध्ये लॉग इन केल्यावर बंद करताना आठवणीने लॉग आउट करा.
वाचाः मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक