काय आहे Li-Fi 5G नेटवर्क? ज्यामुळे Wi-Fi मागे पडणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः LiFi Network: तुम्ही थ्री इडियट्स चित्रपट जरूर पाहिला असेल. त्या चित्रपटात आमीर खानने फुंगसुरू वांगडूची भूमिका बजावली होती. त्याने लडाखमध्ये एक नवीन टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी केली होती. आता तुम्ही विचार करीत असाल की, वाय फाय तर ऐकले आहे. परंतु, हे लायफाय काय आहे. तर लायफायचा अर्थ आहे लाइफ फिडेलिटी टेक्नोलॉजी आहे. या टेक्नोलॉजीच्या डोंगराळ परिसरात 5G नेटवर्क पोहोचण्यास मदत होते.

डोंगराळ भागात पोहोचेल हाय स्पीड इंटरनेट
खरं म्हणजे डोंगराळ भागात नेटवर्क लावणे आणि विजेने त्याला चालू ठेवणे खूपच अवघड काम आहे. सोबत फायबर नेटवर्क केबल टाकावे लागत नाही. परंतु, लडाख मध्ये राहणारे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या प्रयत्नाने भारतातील पहिले LiFi लेजर 5G इंटरनेटची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. सोबत भारताने लडाखमध्ये जगातील पहिले लाईफाई 5G नेटवर्क बनवून इतिहास रचला आहे.

वाचाः iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी

या कंपनीची घेतली मदत
या कामात अहमदाबादची कंपनी नव वायरलेस टेक्नोलॉजीची मदत घेतली आहे. सोबत लडाखच्या SECMOL चे स्टूडेंट्सच्या या टेक्नोलॉजीला बनवण्यात मदत घेतली गेली. लाय फाय नेटवर्कवरून म्हटले जात आहे की, यात वाय फायच्या तुलनेत फास्ट इंटरनेट स्पीड मिळते. सोबत ही टेक्नोलॉजी पर्यावरणासाठी सुद्धा चांगली आहे.

वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!

बनवण्यासाठी खूपच कमी किंमत

सोनम वांगचुक यांच्या म्हणण्यानुसार, लाय फाय टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. हे टॉवर बेस्ड वाय फाय नेटवर्क अनेक पटीने चांगले आहे. यात लेजर बीम द्वारे ५जी डेटाला ट्रान्समिशन केले जाते. या टेक्नोलॉजी मध्ये 5G नेटवर्कला पोहोचण्यास मदत करते.

वाचाः ‘या’ १० प्रकारचे पासवर्ड कधीच ठेऊ नका, अवघ्या काही सेकंदात हॅकर्स ओळखू शकतात तुमचा Password

Source link

5G5G इंटरनेटLiFiLiFi 5g NetworkLiFi NetworkSECMOL
Comments (0)
Add Comment