लाइव्ह लोकेशन शेअरिंग iPhone, iPad आणि Android फोनवर उपलब्ध आहे. लाइव्ह लोकेशन लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून शेअर केले जाऊ शकत नाही पण तुम्ही डेस्कटॉपवर इतरांचे शेअर केलेले लोकेशन पाहू शकता. तर आता iPhone, iPad आणि Android वरून Google Maps वर एखाद्याचे लोकेशन कसे ट्रॅक करायचे ते जाणून घेऊ…
कसं कराल ट्रॅकिंग?
- सर्वात आधी ज्याचं लोकेशन तुम्हाला ट्रॅक करायचं आहे, त्याच्या Android फोन किंवा टॅबमध्ये Google Maps उघडा आणि त्यावरील प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- त्यानंतर लोकेशन शेअरिंग वर जा आणि तुम्हाला संबधित व्यक्तीचं लोकेशन ट्रॅक करायचं असल्यास त्याची लोकेशन तुमच्या ईमेल आयडीवर शेअर करा…
- तसंच लोकेशन ही जितक्या वेळासाठी ट्रॅक करायची आहे तो टाईम निवडा.
- समजा तुम्ही शेअर करत असलेल्या व्यक्तीकडे Google मेल नसेल तर लिंकही शेअर करता येऊ शकते.
- Apple च्या आयफोन किंवा आयपॅडमध्येही वरील प्रकारेच तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर करु शकता. एकदा तुम्ही ही लाईव्ह लोकेशन शेअर करुन घेतली की, तुम्ही संबधित व्यक्ती कधी, कुठे जात आहे, ते पाहू शकता आणि त्याला घरबसल्या ट्रॅक करु शकता.
वाचाः Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट