तिसऱ्या दिवसाच्या कमाईत ५५ टक्क्यांनी वाढ
दुसरीकडे, बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, सिनेमाचे पहिले दोन दिवसही बंपर राहिले आहेत. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, पहिल्याच दिवशी दिग्दर्शक सुदीप्तो सेनच्या सिनेमाने ८ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सिनेमाने दुहेरी आकडा गाठत शनिवारी बॉक्स ऑफिसवर १०.५० कोटींची कमाई केली होती. आता रविवारी १६.५० कोटींची कमाई करून सिनेमा ‘द काश्मीर फाइल्स’ची पुनरावृत्ती करत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ प्रमाणे आलेख बनवला जात आहे
‘द काश्मीर फाइल्स’नेही पहिल्या दिवशी फक्त ३.२५ कोटींची कमाई केली आणि नंतर हळूहळू कलेक्शनचा आकडा वाढत गेला होता. या सिनेमाने दुसऱ्या दिवशी ८.२५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १५ कोटींची कमाई केली होती. ‘द केरळ स्टोरी’चा आलेखही असाच वाढत जाईल अशी अपेक्षा निर्माते करत आहेत.
दिवस | तारीख | कमाई |
पहिला दिवस | ०५ मे २०२३ | ०८.०० कोटी |
दुसरा दिवस | ०६ मे २०२३ | १०.५० कोटी |
तिसरा दिवस | ०७ मे २०२३ | १६.५० कोटी |
एकूण कमाई | ३५.०० कोटी |
तमिळनाडूमध्ये सिनेमावर टांगती तलवार
काही प्रेक्षक सिनेमाकडे आकर्षित होत असताना, काही जण याला विरोध करत आहेत. आताही तमिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने रविवारी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. प्रदर्शनामुळे झालेला गोंधळ हे त्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. त्यासोबतच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत नसल्याचेही बोलले जात आहे. राज्यात ‘द केरळ स्टोरी’चे प्रदर्शन थांबवण्याची मागणी नाम तमिलार कच्ची (एनटीके) ने केली असून त्यांच्या विरोधानंतर ७ मेपासून सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सिनेमात प्रसिद्ध स्टार नाही सांगून प्रदर्शन थांबवण्यात आले
असं असलं तरी, इथे PVR सारख्या काही पॅन इंडिया ग्रुपमध्येच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तर स्थानिक मल्टिप्लेक्स मालकांनी सिनेमा न चालवण्याचा निर्णय आधीच घेतला होता कारण त्यात कोणताही प्रसिद्ध स्टार नाही. या निर्णयांमुळे चित्रपटाच्या कमाईवरही मोठा परिणाम होत आहे.
धर्म परिवर्तनावर आधारित ‘द केरल स्टोरी’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला?