Amazon Sale: फक्त ३९ हजार २९९ रुपयात मिळतोय iPhone 14

नवी दिल्लीः आयफोन १४ खरेदी करायचा असेल तर Amazon Great Summer Sale मध्ये मिळत असलेल्या या ऑफर संबंधी जाणून घेणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. या फोनला ४० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही खरेदी करू शकता. या फोन सोबत फ्लॅट डिस्काउंट पासून एक्सचेंज पर्यंत अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. जाणून घ्या सविस्तर.

iPhone 14 ची किंमत आणि डिस्काउंट
आयफोन १४ ला तुम्ही ३९ हजार २९३ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. कंपनी या फोन सोबत अमेझॉन प्राइम एक्सक्लूसिव्ह ऑफर देत आहे. या किंमतीत फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला जुना स्मार्टफोनला एक्सचेंज करावे लागणार आहे. यासोबत अन्य काही ऑफर्स सुद्धा दिल्या जात आहेत.

सेलमध्ये या फोनला ६६ हजार ९९९ रुपये (मिडनाइट ब्लॅक कलर) मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. बँक ऑफर्स मध्ये कोटक बँकेचे कार्ड्स वरून पेमेंट केल्यास १ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. तर ICICI बँकेच्या कार्डवरून पेमेंट केल्यानंतर ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. १ हजार रुपयाचा डिस्काउंट दिल्यानंतर याची किंमत ६५ हजार ९९९ रुपये राहते.

फोनला एक्सचेंज केल्यानंतर ऑफर दिला जात आहे. जुना फोन एक्सचेंज केल्यानंतर २१ हजार ७०० रुपयांपर्यंत ऑफर दिला जात आहे. संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यानंतर फोनला ४४ हजार २९९ रुपये किंमतीत फोन मिळू शकतो. याशिवाय, Amazon Pay Rewards अंतर्गत ५ हजार रुपयाचा कॅशबॅक दिला जात आहे. यानंतर या फोनची किंमत ३९ हजार २९९ रुपये राहते. याशिवाय, रोज २५९ रुपये देऊन सुद्धा हा फोन खरेदी करू शकता. ही ऑफर तुम्हाला फक्त प्राइम यूजर असाल तरच मिळू शकते.

वाचाः Old Car Selling Tips: जुनी कार विकायचीय?, अशी मिळवा जास्त किंमत, पाहा टिप्स

iPhone 14 चे फीचर्स
या फोनमध्ये सिरेमिक शील्ड प्रोटेक्शन सोबत ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे. यात A15 बायोनिक चिपसेट दिले आहे. या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा तसेच अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा १२ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग TrueDepth कॅमेरा दिला आहे. फोन बायोमेट्रिक अनलॉकिंगसाठी फेस आयडी टेक्नोलॉजी दिली आहे.

वाचाः छोटी दिसणारी इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये ४०० किमीची रेंज देणार, जाणून घ्या डिटेल्स

Source link

amazon great summer saleamazon great summer sale 2023iphone 14iphone 14 featuresiphone 14 priceiphone 14 price in india
Comments (0)
Add Comment