Jio Fiber चे दोन जबरदस्त प्लान्स, फास्ट इंटरनेट स्पीडसह बरचं काही..

नवी दिल्ली : High Speed Jio Fiber Plan : आजकाल इंटरनेट फक्त एक मनोरंजनाची गोष्ट नाही तर गरज बनली आहे. अगदी शिक्षणापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत सर्वकाही इंटरनेटवर अवलंबून असतं. त्यामुळे प्रत्येकाला मोबाईलमध्ये तसंच घरी इंटरनेट फारच गरजेचं असतं. आजकाल विविध कंपन्यांच्या फायबर प्लान्समुळे घरोघरी फास्ट इंटरनेट आलं असून आता रिलायन्स जिओ कंपनीने देखील दमदार असा जिओ फायबरचा प्लान आणला आहे. कंपनीने आणलेल्या या दोन प्लान्सची किंमत अनुक्रमे ३,९९९ आणि ८,४९९ रुपये अशी आहे. ज्यामध्ये 1gbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तसंच ओटीटी सुविधाही मिळणार आहेत. तसंच अधिकची व्हॅलिडिटीही मिळणार आहे, सविस्तर जाणून घेऊ दोन्ही प्लान्सबद्दल…

जिओ फायबरचा ३,९९९ रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये 1gbps पर्यंत अपलोड आणि डाऊनलोड स्पीड मिळणार आहे.तसंच या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा दिला जाणार आहे. प्लानच्या वार्षिक सब्सक्रिप्शनवर ३० दिवसांची अधिकची व्हॅलिडिटी देखील मिळणार आहे. या प्लानमध्ये फ्री कॉलिंग आणि ५५० हून अधिक टीव्ही चॅनेल फ्री असणार आहेत.तसंच कंपनी या प्लानमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, डिज्नी हॉटस्टार, सोनी लिव्ह, जी५, वूट अशा दमदार ओटीची अॅप्सचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

वाचा : समोरच्याला न सांगता त्याची लोकेशन आता ट्रॅक करता येणार, Google Map ची ‘ही’ आहे खास ट्रिक

जिओ फायबरचा ८,४९९ रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये इंटरनेट युजसाठी ६६०० जीबी डेटा मिळणार आहे. तसंच कंपनी 1gbps पर्यंत इंटरनेट स्पीड देणार आहे. प्लानच्या वार्षिक सब्सक्रिप्शनवर ३० दिवसांची अधिकची व्हॅलिडिटी देखील मिळणार आहे. या प्लानमध्ये फ्री कॉलिंग आणि ५५० हून अधिक टीव्ही चॅनेल फ्री असणार आहेत.तसंच कंपनी या प्लानमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, डिज्नी हॉटस्टार, सोनी लिव्ह, जी५, वूट असे तब्बल १५ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

वाचा : स्नेक गेमची मजा पुन्हा घेता येणार, २२ दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफही, पाहा नोकियानं आणलेले तीन जबरदस्त फोन्स

Source link

jiojio fiberottReliance Jioजिओ फायबरजिओ फायबर प्लान
Comments (0)
Add Comment