नवी दिल्ली : Warrne Buffet on AI : मागील काही महिन्यांपासून टेक्नोलॉजीच्या जगात ChatGPT ची तुफान चर्चा होताना दिसत आहे. Open AI या कंपनीने हे एक AI Tool तयार केले असून त्याचा वापर सर्रास सर्वजण करताना दिसत आहेत. अशामध्ये याचे फायदे एकीकडे समोर येत असताना काही तोटेही समोर येत असून अनेकजण या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबद्दल सावध देखील रत आहेत. Artificial intelligence (AI) या तंत्रज्ञानाची सुरुवात ज्या जेफ्री हिंटन यांनी केली होती, त्यांनी काही काळापूर्वीच गुगलचा राजीनामा देत AI बद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर आता प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक आणि Multinational conglomerate holding company असणाऱ्या Berkshire Hathaway कंपनीचे सीईओ असणाऱ्या वॉरेन यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सपासून सर्वांना सावध केलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार वॉरेन यांनी AI टेक्नोलॉजीची तुलना थेट अनुबॉम्बसोबत केली आहे.काही काळापूर्वी बिल गेट्स यांच्या आग्रहावर वॉरेन बफे यांनी ChatGPT वापरलं होतं. त्यांना हा अनुभव आणि फारच आवडला होता. पण आता ते याच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सपासून घाबरत आहेत. ते म्हणाले ‘जेव्हा कोणीही संपूर्ण काम करतं तेव्हा त्याच्याब्दल थोडी शंका येते.’ अनुबॉम्बचा शोधही चांगल्या कामासाठी झाला होता, पण त्याचा दुरुपयो झाला. तसंच AI जगताली साऱ्या गोष्टी बदलेल पण माणसाची विचारशक्ती बदलू शकत नाही.
जेफ्री हिंटन यांचही AI बद्दल महत्त्वाचं वक्तव्य
जेफ्री हिंटन यांच्या AI विश्वात अफलातून कामगिरी केली आहे. सर्वात आधी त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स या प्रणालीवर काम सुरु केलं होतं. दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्यांनी गुगलचा राजीनामा दिला. गुगलचा राजीनामा देत त्यांनी AI संबधित एक सूटक ट्वीटही केलं. जेफ्री हिंटन म्हणाले, ”आज न्यूयॉर्क टाईम्सचे रिपोर्टर Cade Metz यांनी लिहिलं की मी Google सोडलं जेणेकरून मी Google वर टीका करू शकेन. पण मूळात मी गुगल सोडलं जेणेकरून मी AI च्या धोक्यांबद्दल बोलू शकेन याचा Google वर कसा परिणाम होतो याचा विचार न करता.” या त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी सूचकपणे आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे भविष्यात फार धोके असल्याचंच स्पष्ट केलं आहे.
वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो