तिसर्या दिवशीही चित्रपटाने मोठी कमाई केली. रविवारी ‘द केरळ स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर १६ कोटी रुपयांची कमाई केली. आता निर्मात्यांच्या नजरा चौथ्या दिवसाच्या कमाईवर होत्या, म्हणजे सोमवार आणि आठवड्याच्या सुरुवातीचा दिवस सिनेमासाठी फार महत्त्वाचा होता. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाने सोमवारी चौथ्या दिवशी वीकेंडसारखीच कमाई केली.
सोमवारची कमाईही दोन अंकीच झाली
सोमवारची कमाई शनिवारच्या कमाईच्या जवळपास होती. sacnilk च्या अहवालानुसार, चित्रपटाने १०.५० कोटींची कमाई केली आहे आणि शनिवारीही जवळपास हाच आकडा राहिला. म्हणजेच चित्रपटाने चार दिवसांत एकूण ४३.८५ कोटींची कमाई केली आहे. छोट्या स्टार्ससह सुमारे ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट सध्या देशातील एक महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. हा चित्रपट देशभरात जवळपास १ हजार ३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.
दिवस | तारीख | कमाई |
पहिला दिवस | ५ मे २०२३ | ०८.०० कोटी |
दुसरा दिवस | ०६ मे २०२३ | १०.५० कोटी |
तिसरा दिवस | ०७ मे २०२३ | १६.५० कोटी |
चौथा दिवस | ०८ मे २०२३ | १०.५० कोटी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं समर्थन
या चित्रपटाबाबत अनेक ठिकाणी गदारोळ होत असतानाच अनेक भागातून या चित्रपटाचे कौतुकही होत आहे. पंतप्रधान मोदींनीही या चित्रपटाचं समर्थन केलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे नाव त्यांनी त्यांच्याच शब्दात ‘केरळ फाइल्स’ असे ठेवले आहे. अलीकडेच एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, ”द केरळ स्टोरी’ हा चित्रपट दहशतवादी कटावर आधारित आहे. या चित्रपटात दहशतवादाचे कुरूप सत्य दाखवण्यात आले आहे.’
धर्म परिवर्तनावर आधारित ‘द केरल स्टोरी’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला?