एअरटेल पोस्टपेड ५०० रुपयांपेक्षा कमी
Airtel ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान हा मासिक प्लान आहे जो 40GB डेटा, अमर्यादित कॉलिंग (स्थानिक, STD आणि रोमिंग), १०० एसएमएस दिवसाला दिले जातात. तसंच Airtel Thanks रिवॉर्ड देखील ऑफर करतो. प्लानमध्ये कोणतेही मोफत फॅमिली अॅड-ऑन किंवा OTT सदस्यत्व दिले जात नाही.
त्यानंतरचा असणारा एअरटलेचा ४९९ रुपयांचा प्लान 75 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग (लोकल, STD आणि रोमिंग), देातत. आणि Airtel Thanks Rewards ऑफर आहेत. या प्लॅन अंतर्गत ६ महिन्यांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप, 1 वर्षासाठी Disney + Hotstar Mobile, Wink Premium आणि इतर फायदे उपलब्ध आहेत. प्लानमध्ये कोणतेही मोफत फॅमिली अॅड-ऑन किंवा OTT सदस्यत्व दिले जात नाही.
Jio पोस्टपेड प्लॅन ५०० रुपयांपेक्षा कमी
Jio चा २९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान हा एक मासिक प्लान आहे. यात 30 GB डेटा (त्यानंतर 10 रुपये प्रति GB) सोबत अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दिवसाला दिले जातात . या योजनेअंतर्गत जिओ वापरकर्त्यांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud यासह Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
तसंच जिओचा ३९९ रुपयाचा पोस्टपेड प्लान हा देखील मासिक प्लान आहे, जो 75GB डेटा, अमर्यादित कॉलिंग (लोकल, STD आणि रोमिंग), १०० एसएमएस दिवसाला दिले जातात. यामध्ये कुटुंबातील 3 सदस्यांसाठी प्रति सिम अतिरिक्त 5GB डेटा ऑफर कंपनी करतो. प्लानचा मासिक कोटा संपल्यानंतर, प्रत्येक 1 GB डेटासाठी १० रुपये आकारले जातात. या प्लॅन अंतर्गत Jio वापरकर्त्यांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud यासह Jio अॅप्समध्ये प्रवेश मिळत आहे.
वाचा : आनंदाची बातमी! आता प्रत्येक फोनमध्ये FM Radio मिळणार, सरकारचे कंपन्यांना आदेश